अवैधरीत्या हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणार्या आरोपीस अटक

अवैद्यरित्या हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणा-या आरोपीस अटक. 

कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत २ किमी अंतरावर हरिहर नगर कांन्द्री येथे आरोपी प्रदीप उर्फ गोलु देवानंद हा विनापरवाना अवैधरित्या हातात तलवार धारदार शस्त्र घेऊन लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होईल अश्या स्थितीत मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करित कारवाई करण्यात आली.

        प्राप्त माहिती नुसार गुरुवार (दि.३) जुन २०२१ ला रात्री १०:१० ते १०:४५ वाजताच्या सुमारास आरो पी प्रदीप उर्फ गोलु देवानंद वय २७ वर्ष रा. काटोल हा हरीहर नगर कांन्द्री कन्हान येथे सार्वजनिक ठिकाणी हरीहर चौकात स्वत जवळ धारधार शस्त्र तलवार घेऊ न गुन्हा करण्याचा उद्देशाने विनापरवाना अवैधरित्या लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होईल अश्या स्थितीत मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी पकडुन सदर प्रकरणी सरकार तर्फे पोहवा खुशाल रामटेके पो स्टे कन्हान यांचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपी प्रदीप उर्फ गोलु देवानंद याच्या विरुद्ध कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ मपोका कायदान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस सुचना पत्रावर सोडण्यात आले. सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवलदार खुशाल रामटेके पुढील तपास करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रेल्वेच्या तिसऱ्या मार्गामुळे स्टेशन रोड परिसरत  सम्भाव्य धोक्यावर पावसाळ्यापुर्वी उपाय करा

Thu Jun 10 , 2021
रेल्वेच्या तिसऱ्या मार्गामुळे स्टेशन रोड परिसरत  सम्भाव्य धोक्यावर पावसाळ्यापुर्वी उपाय करा.  #) कन्हान शहर काॅंग्रेस कमेटीचे न प मुख्याधिकारी ला निवेदन.  कन्हान : –  नगरपरिषद अंतर्गत गेल्या काही दिवसा पासुन रेल्वेच्या तिस-या लाईनेचे काम सुरु असुन हळु हळु काम स्टेशन रोड परिसरत होत असल्यामुळे येथे उध्दभवणा-या सम्भाव्य धोक्यावर पावसाळ्यापुर्वी योग्य उपाय योजना करण्याची […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta