भुमिपुत्र संघटना व्दारे स्वयं सेवेतुन विर्सजन घाटाची स्वच्छता ढिवर समाज संघटना जीवन रक्षक पथकांची उत्कृष्ट कामगिरी.

भुमिपुत्र संघटना व्दारे स्वयं सेवेतुन विर्सजन घाटाची स्वच्छता

ढिवर समाज संघटना जीवन रक्षक पथकांची उत्कृष्ट कामगिरी.

 

कन्हान,ता.15 सप्टेंबर

   शहरातील व ग्रामिण भागातील श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आल्याने मॉ काली माता मंदीर परीसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने भूमिपुत्र संघटना व्दारे स्वच्छता अभियान राबवुन परिसराची स्वच्छता करण्यात आली.


कन्हान नदी काठावरील मॉ काली माता मंदीर विसर्जन घाटावर नगरपरिषद कन्हान-पिपरी व्दारे प्रतिबंधक नियम पालन करण्याकरिता घाटावर कट घरे, विद्युत, स्वयंसेवक, माहीती व मदत कक्षासह व्यवस्थित व्यवस्था करण्यात आली होती. तसेच नगर परिषदेच्या नवीन इमारतीचा पटगंणात कृत्रिम तलाव निर्माण करून घरगुती लहान गणेश मुर्तीचे विर्सजन करण्या करिता नगराध्यक्षा व उपाध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांनी लोकांना आपले घरगुती गणेश मुर्ती कृत्रिम तलावात विर्सजन करण्याचे आव्हान केले होते. ३० गावा पैकी सार्वजनिक गणेश मंडळ कन्हान शहर ६, ग्रामिण १२ असे १८ तर घरघुती ७०० श्री गणेश मुर्तीचे शिस्तबध्य विसर्जन ढिवर समाज सेवा संघटना कन्हान अध्यक्ष सुतेश मारबते यांच्या नेतृत्वात संघटनेच्या जीवन रक्षक पथका चे स्वयंसेवक वालचंद बोंदरे, सुधाकर सहारे, राजु मारबते, सचिन खंडाते, विक्की हावरे, हेमराज मेश्राम, रामचंद्र भोयर, प्रमोद गोंडणे, धर्मराज खांडाते, बंडु केवट, धनराज बावणे, मोहन वहिले, संजय मेश्राम, रवी केवट, शिवराम खंडाते, उमेश मेश्राम आदीने केले. संपुर्ण मानवाच्या कल्याणार्थ भाविक मंडळीने शांततेत १० दिवस मनो भावे पुजा अर्चना करून श्री गणेश मुर्तीचे तीन दिवस विसर्जन करण्यात आल्याने घाट परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वत्र कचरा साचुन अस्वच्छा झाल्याने भूमिपुत्र संघटना कन्हान व्दारे स्वयंफुर्त स्वच्छता अभियान राबवुन साफसफाई करित नदी घाट परिसर स्वच्छ करण्यात आला.

या अभियानात चिंटु वाकुडकर, हरीश तिडके, समशेर पुरवले, सुनिल लक्षणे, अशोक नारनवरे, श्रीकृष्ण माकडे, अमित चौधरी, प्रदीप गायकवाड, अजय चव्हाण आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नितीन गडकरी येताच पुलावर उजेड, जाताच अंधाराचे साम्राज्य कन्हान नदीचा पुलावरील पथदिवे नियमितपणे सुरू ठेवण्याची मागणी

Wed Sep 21 , 2022
नितीन गडकरी येताच पुलावर उजेड, जाताच अंधाराचे साम्राज्य कन्हान नदीचा पुलावरील पथदिवे नियमितपणे सुरू ठेवण्याची मागणी कन्हान,ता.20 सप्टेंबर कन्हान नदी वरील नवीन पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.  पुलावर लावलेले पथदिवे मागील काही दिवसांपासून पासुन बंद पडले. पुलावर सर्वत्र काळोक पसरून  अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याने कन्हान […]

You May Like

Archives

Categories

Meta