कोळसा खदान नं.६ ला गोळीबार करणारे आरोपी फरार 

कोळसा खदान नं.६ ला गोळीबार करणारे आरोपी फरार

कन्हान,ता.०६ जून

     परिसरातील कोळसा खदान नं.६ येथे काही तरुणांनी गोळीबार करून घटनास्थळा वरून बंदुक घेऊन फरार झाले. तर पोलीसांनी घटनास्थळा वरून गोळीबारातील एक काढतुस ची पितळी खाली केस मिळुन आल्याने संशयित चिंटु राजपुत व बल्लन गोस्वामी व त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पुढील तपास करित आरोपींचा शोध घेत आहे.

            प्राप्त माहितीनुसार शनिवार (दि.३) जुन ला दुपारी ३ ते ५ वाजता दरम्यान वेकोलि कोळसा खदान नं. ६ ते टेकाडी, गोंडेगाव कडे जाणा-या रस्त्याकडील अंगणवाडी जवळ काही तरुणांनी गोळीबार केल्याची माहिती शहरात वाऱ्या सारखी पसरल्याने परिसरातील नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गोळीबाराची माहिती कन्हान पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण, मुदस्सर जमाल, हरीश सोनभद्रे, वैभव बोरपल्ले, सम्राट वनपर्ती यांनी घटनास्थळ गाठुन पाहणी केली. दुस-या दिवसी घटना स्थळी पोलिसांना गोळीबारातील एक काढतुसची पितळी खाली केस मिळुन आली. मोक्याची परिस्थिती बघता सदर ठिकाणी गोळीबार झाल्याचे लक्षात आले. गोळीबार करणारे संशयित इसम चिंटु राजपुत व बल्लन गोस्वामी व त्यांच्या सोबत असलेले साथीदार हे घटना स्थळावरून बंदुक घेऊन पळुन गेले. असे निष्पन्न झाल्याने नागपुर ग्रामिण चे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी आशिष कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर हयानी सरकार तर्फे फिर्यादी वैभव बोरपल्ले यांचे तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी चिंटु राजपुत व बल्लन गोस्वामी आणि इतर साथीदार विरुद्ध ३,२५ भाहका अन्वये गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस व कन्हान पोलीस पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

खिडकी लावण्याचा वादातून चाकू हल्ला

Tue Jun 6 , 2023
खिडकी लावण्याचा वादातून चाकू हल्ला कन्हान,ता.०६ जून     कांद्री वॉर्ड क्रमांक एक येथे खिड़की लावण्याचा वादातून आरोपी मनोज भोले याने सुरेश सहारे याच्यावर चाकूने हल्ला केला. यात युवक गंभीर जखमी झाला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     कांन्द्री येथील सूर्यभान उमराव गायधने यांचे घर बांधण्याचा कंत्राट […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta