ऑनलाईन शिक्षण न देताच फी भरण्याचा तगादा   

ऑनलाईन शिक्षण न देताच फी भरण्याचा तगादा 

#) बिकेसीपी शाळा कन्हानचे फी भरल्याशिवाय पेपर जमा करण्यास नकार. 

   

#) विद्यार्थ्यांचे प्रमोशन न करण्याची धमकी.

न्हान : – येथील इंग्रजी माध्यमाच्या बीकेसीपी शाळे ने ऑनलाईनच्या नावावर शिक्षणाचा बाजार मांडला आहे. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन न करता विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी घरी पेपर पाठविले. या आडून पेपर जमा करण्यासाठी शाळेत आलेल्या पालकांना फी जमा करण्याचा तगादा लावला. फी जमा न केल्यास विद्यार्थ्यांचे प्रमोशन करण्यात येणार नसल्याची धमकीच पालकांना दिल्याने पालकवर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी शिक्षण विभागाने बिकेसीपीवर कार्यवाही करून फी कमी करण्याची मागणी पालकानी केली आहे. 

जाहिराती करिता संपर्क 7020602961

          कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपुर्ण देशात मार्च महिन्यापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या . परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणित नुकसान होऊ नये म्हणुन वर्क टु होम तत्वावर शाळेव्दारे ऑनलाईन शिक्षण दे ण्यात येत आहे. कन्हान शहरातील इंग्रजी माध्यमाच्या बिकेसीपी शाळेने कुठल्याही योग्य अॅपचा वापर केला नाही. ऑनलाईनच्या नावावर फक्त अॅडमिन मॅसेज पाठविणा-या व्हाॅटसअप ग्रुपवर मागील वर्षा च्या विद्यार्थ्याच्या नोटची फोटो पाठविले. विद्यार्थ्याना न समजलेल्या अभ्यासाचे समाधान न करता विद्या र्थ्याना पेपर घरी सोडविण्यासाठी दिले. सदर उत्तर पत्रिका पालकांना शाळेत जमा करण्यासाठी बोलावून पूर्ण फी भरल्याशिवाय उत्तरपत्रिका घेणार नाही. विद्यार्थ्यास वरच्या वर्गात बढती करणार नाही, बोर्डाचे फाॅर्म भरणार नाही अशा प्रकारची धमकी शाळा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. 

    सोमवारी (दि.१९) एलकेजी व १० वीच्या पालकांना, तर मंगळवारी (दि.२०) युकेजी व ९ वीच्या पालकांना सुध्दा तोच त्रास झाल्याने शाळेच्या जिम्मेदार व्यक्ती नसल्याने पालकांनी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे यांनी बोलावून व्यथा सांगितले. परिस्थि९ती लक्षात घेता शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासन व पालकांची बैठक लावण्याचे आदेश दिले. बुधवारी (दि.२१) ला १ ली व ८ वी च्या पालकांना सुध्दा तोच त्रास झाला. जिल्हा परिषद येथे अध्यक्षा रश्मी बर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापिका प्राथमिक, माध्यमिक व पालकांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका श्रीमती नाथ (माध्य), श्रीमती राव (प्राथ) यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने अध्यक्षांनी चांगलेच सुनावले. पालकांच्या समाधाना करिता संस्था चालकांची सोमवारी (ता २६) बैठक लावण्याचे ठरले. वर्ग ८ ते १० वीच्या विद्यार्थ्या च्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून तरी जुन ते ऑक्टोंबर पर्यंत एखादी पालक समितीची बैठक आयोजित केली का? विद्यार्थ्यांचे शिक्षण व शा ळेची फी घेण्या विषयी चर्चा केली का ? ऑनलाईन खरच शिकविले का ? शासनाच्या निर्देशना नुसार विद्यार्थ्याना अभ्यासक्रम सांगितला आहे का? वर्क टु होम नुसार विद्यार्थ्याना अभ्यासाचे साधे वेळापत्रक तरी दिले का? फक्त फी वसुल करण्या करिताच पेपर घेऊन पालकांना शाळेत बोलाविले का? शाळा फी प्रमाणे शिक्षण व सोयी सुविधा देत शिस्तीचे व नियमा चे पालन करित आहे का ? असे अनेक प्रश्न शाळेने निर्माण करून पालकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. शिक्षण विभागातील संबधित अधिका-यांनी दखल घेऊन इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा व संचालक मंडळावर कार्यवाही करून फी करण्याची मागणी  पालकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर : कोरोना अपडेट

Sat Oct 24 , 2020
कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर #) १६ संशयिताच्या चाचणीत दोन रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८४० रूग्ण.  कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे २४ संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणी घेण्यात आली. यात सर्व निगेटिव्ह आले. (दि.२२) व (दि.२३) च्या […]

Archives

Categories

Meta