नरसाळा शिवारात अवैद्य रेती चोरी चा ट्रक्टर पकडला :  २ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त.   

नरसाळा शिवारात अवैद्य रेती चोरी चा ट्रक्टर पकडला. 

#) दोन आरोपीसह २ लाख ५३ हजा राचा मुद्देमाल जप्त.   

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नरसाळा शिवारात एका ट्रक्टर ट्रालीत एक ब्रास रेती अवैद्यरित्या चोरून नेताना कन्हान पोलीसांनी पकडुन दोन आरोपी सह २ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त करित एकास अटक केली. 

     प्राप्त माहीतीनुसार शुक्रवार (दि.१८) ला मध्यरात्री १ वाजता पेट्रोलिंग दरम्यान नरसाळा शिवारात सोनालिका कंपनी चा ट्रक्टर क्र एम एच ४० बी ई ५८६८ ने ट्रालीत अवैद्यरित्या १ ब्रास रेती चोरून नेताना आरोपी चालक प्रेम गोपाल समलिंगे व संभा माणिक वडे दोन्ही रा. नरसाळा यांना पकडुन कन्हान पोलीसानी ट्रक्टर किमत २ लाख, ट्राली ५० हजार व १ ब्रास रेती ३ हजार असा एकुण ३ लाख ५३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपी विरूध्द कलम ३७९, १०९ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून चालक प्रेम समलिंगे यास अटक केली. ही कारवाई कन्हान पोलीस स्टेशन चे हेकॉ कुणाल पारधी, वैभव बोरपले हयांनी यशस्विरित्या पार पाडली. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान परिसरात नविन ११ रूग्ण 

Sat Sep 19 , 2020
कन्हान परिसरात नविन ११ रूग्ण  #) कन्हान ३,निलज २,पिपरी १, कां द्री १,नागपुर ४ असे ११ रूग्णासह कन्हान परिसर ६३४    कन्हान : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.१९) ८८ लोकांच्या रॅपेट व स्वॅब तपासणीत १०, स्वॅब १ असे ११ […]

Archives

Categories

Meta