दुचाकीला कारने धडक दिल्याने दोन गंभीर जख्मी 

दुचाकीला कारने धडक दिल्याने दोन गंभीर जख्मी

कन्हान,ता.०६ जून

 ‌नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ४४ वरील केरडी बसस्थानका जवळ कार चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन दुचाकी वाहना ला जोरदार धडक दिल्याने दुचाकी वाहन चालक व त्याची आई गंभीर जख्मी झाल्याने रुग्णालयात दाखल केले आहेत.

     रविवार (ता.४) जुन ला सकाळी ९ वाजता मनसर येथे दत्त मंदीरात पूजा व जेवनाचा कार्यक्रम असल्याने मनोज रामदास कोंगे (वय ३२) रा.वडोद यांचा मोठा भाऊ संदीप रामदास कोंगे (वय ३५) पूजा व जेवणाचा कार्यक्रम मनसर येथून आटपून वडोदा येथे परत जात होते. दुपारी ३ वाजता च्या दरम्यान मनोज हा खाजगी कामाने नागपूर येथे गेला होता. दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० सीके ७४०५ स्लेंडर हिरोहोंडा ला कार क्रमांक एम एच ४९ बीके ५५९४ ने धडक दिली यात संदीप रामदास कोंगे याला छातीवर व डाव्या खाद्याला मार लागला‌ तर आईच्या उजव्या पायाला मार लागल्याने फॅक्चर झाला. स्थानिक लोकांचे मदतीने कामठी येथे रुग्णालयात दाखल केले.

   पोलीसांनी मनोज कोंगे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी कार चालका विरुद्ध अप क्रमांक ३४१/२३ कलम २७९ , ३३७ भांदवि सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

काळा आवाक परदेशी पक्ष्याला दिले जिवनदान वाईल्ड लाइफ ॲनिमल अँड नेचर रेसक्यु बहुउद्देशीय संस्था व वनविभागाची कामगिरी

Tue Jun 6 , 2023
काळा आवाक परदेशी पक्ष्याला दिले जिवनदान वाईल्ड लाइफ ॲनिमल अँड नेचर रेसक्यु बहुउद्देशीय संस्था व वनविभागाची कामगिरी कन्हान,ता.०६ जून     वाघधरे वाडी येथे उप-सहारा आफ्रिकेतील पक्षी काळा आवाक(हॅडेडा आयबिस ) करंट लागल्याने जख्मी अवस्थेत आढळल्याने सुजान नागरिकांनी वाईल्ड लाइफ ॲनिमल अँड नेचर रेसक्यु बहु उद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन वन विभागाच्या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta