चंद्रपाल चौकसे, लॉयन्स क्लब यांचा संयुक्त पुढाकाराने – शव पेटी दान

चंद्रपाल चौकसे, लॉयन्स क्लब यांचा संयुक्त पुढाकाराने – शव पेटी दान

कन्हान, ता.२७ फेब्रुवारी 

   शहरात शव पेटीची नागरिकांना कमतरता भासत असल्याने ही अत्यंत महत्वाची गरज लक्षात घेत पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे यांनी लॉयन्स क्लब नागपुर लिजेट डिस्ट्रीक ३२३४ एचआय च्या संयुक्त सहकार्याने कन्हान नगरपरिषदेला शव पेटी दान देऊन सार्वजनिक उपयोगा करिता नगराध्यक्षाना हस्तांतरित करण्यात आली. 

   सोमवार (दि.२६) ला पारशिवनी तालुक्यातील कन्हान नगरपरिषद अंतर्गत शहरात शव पेटी च्या कमतरतेने एका पेक्षा जास्त व्यकतीचा मुत्य झाल्यास त्याच्या अंतिम संस्कारा करिता नातेवाईकाना वेळ लागत असल्याने मृतदेह व्यवस्थित ठेवण्याकरिता शहरातील नागरिकांना शव पेटीची कमतरता भासत होती.

   ही अत्यंत गरज येथील नागरिकांनी रामटेक क्षेत्राचे काँग्रेस नेते, अध्यक्ष राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महा. तथा पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे यांना लक्षात आणुन दिले. पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे यांनी लॉयन्स क्लब नागपुर लिजेट डिस्ट्रीक ३२३४ एचआय च्या संयुक्त सहकार्याने कन्हान नगरपरिषदे़ला नविन शव पेटी दान देऊन नागरिकांच्या उपयोगाकरिता नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांना हस्तांतरित करण्यात आली.

   प्रसंगी लॉयन्स क्लब नागपुर अध्यक्ष लॉ. मयुरेश काथ्यायन, डिस्ट्रीक गव्हर्नर लॉ बलवीर सिंह विजय, रिजनल चेअर मन लॉ. अनिल मॅथु, झोन चेअरमन लॉ विनायक कावडकर, सेक्रटरी लॉय. मनिषा ठाकुर, न प उपाध्यक्ष योगेश रंगारी, नगरसेविका रेखाताई टोहणे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, राजेश यादव सह मोंटु भूटानी, चंद्रशेखर अरगुल्ले वार, सुर्यभान फरकाडे, शरद वाटकर, अजय लोंढे अमोल प्रसाद, संजय चौकसे, राजेंद्र बावनकुळे, चिंटु वाकुडकर, नामदेव माने, विजय आत्राम, फिरोज बिसेन आणि नगरवासी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नरेश बर्वे यांच्या नेतृत्वात - युवक काँग्रेसच्या मशाल मोर्चा " रोजगार दो, न्याय दो " युवक काँग्रेसची मागणी 

Tue Feb 27 , 2024
नरेश बर्वे यांच्या नेतृत्वात – युवक काँग्रेसच्या मशाल मोर्चा ” रोजगार दो, न्याय दो ” युवक काँग्रेसची मागणी  कन्हान, ता.२७ फेब्रुवारी      नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व रामटेक विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने कन्हान येथे भारतात वाढत्या बेरोजगारी विरोधात ” रोजगार दो, न्याय दो ” या उपक्रमाच्या माध्यमातुन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta