उल्कापात की उपग्रहाचे तुकडे ? चंद्रपूर जिल्ह्यात सापडले अवशेष

उल्कापात की उपग्रहाचे तुकडे ? चंद्रपूर जिल्ह्यात सापडले अवशेष

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लाडबोरी गावलगतच्या शेतात उपग्रह वा यानाचे तुकडे पडल्याने ( Meteorite or satellite pieces ) सर्वत्र कुतुहलमिश्रित आश्चर्य व्यक्त होत आहे . विदर्भात अनेकांना रात्रीच्या अवकाशात रहस्यमय प्रकाश दिसल्यामुळे उल्कापात झाल्याची चर्चा होती . मात्र , लाडबोरी येथे धातूच्या पत्र्याचे मोठे तुकडे आढळून आल्यामुळे हा प्रकार उल्कापाताचा नसल्याचेही बोलले जात आहे .
चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये रात्री साडे सात ते आठच्या सुमारास अवकाशात प्रवाही लाल प्रकाश दिसल्याने नेमका प्रकार काय , असा प्रश्न सर्वांना पडला होता . यानंतर सर्वत्र या प्रकाराचीच चर्चा सुरू झाली आहे . अनेकांनी आपापल्या भागातील व्हीडीओ , फोटो समाजमाध्यमावर शेअरही केले . हा लाल प्रकाश पश्चिम दिशेला आकाशात दिसला . एखादी वस्तू पृथ्वीच्या दिशेने जळत येत असल्याचे हे चित्र होते .
याबाबत चंद्रपूरचे खगोल अभ्यासक प्रा . सुरेश चोपणे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की , एखादा जुना व निकामी झालेला उपग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचले जाऊन वातावरणात घर्षणामुळे त्याचे तुकडे झाले असावे . उल्कापाताची शक्यता त्यांनी नाकारली . निकामी झालेल्या उपग्रहांचा असा भरपूर कचरा अवकाशात आहे . असाच प्रकार नागपुरात २००० सालच्या एप्रिल महिन्यातही घडला होता .


लाडबोरी गावातील शेतात धातूचे मोठे तुकडे आढळून ( Meteorite or satellite pieces ) आले असून यातील एक गोल तुकडा सगळ्यात मोठा आहे . हा मोठा तुकडा एखादा निकामी उपग्रह वा यानाच्या इंधन टाकीचा तुकडा असावा एवढा मोठा आहे . याशिवाय अन्य धातूचे तुकडेही शेतात पडले आहेत . याठिकाणी रात्री पोलिसांनी हे तुकडे ताब्यात घेतल्याची माहिती आहे . अवकाशातून शेतात काही तरी पडल्याचे दिसल्यामुळे घटनास्थळी गावकऱ्यांची मोठा गर्दी झाली होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

निलज (खंडाळा) येथे २५ लाखाचा दरोडा मोठी घटना ; पोलिस प्रशासनावर ?

Fri Apr 8 , 2022
निलज (खंडाळा) येथे ५ लाखाचा दरोडा कन्हान : – पोलीस स्टेशन पासुन पुर्वेस ४ कि.मी अंतरावरील निलज (खंडाळा) येथील कैलास कारेमोरे यांच्या घरी कुणी नसल्याचे पाहुन रात्री अज्ञात चोरानी दरोडा टाकुन घरातील नगदी १ लाख रू.१० तोळे सोने, १ पाव चांदी व इतर जवळपास अदाजे १० ते १५ लाखाचा मुद्देमाल […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta