राज्य स्तरिय तिरंदाजी स्पर्धेत जीनात गजभिये ला कास्य पदक

राज्य स्तरिय तिरंदाजी स्पर्धेत जीनात गजभिये ला कास्य पदक

कन्हान : – राज्य स्तरीय तिरंदाजी स्पर्धा हिंगोली येथे संपन्न होऊन यात नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करि त कुर्वे आर्चरी क्लब नागपूर चा तिरंदाज जीनात गजभिये याने नऊ वर्षांवरील वयोगटात उत्कृष्ट काम गीरी करीत कास्य पदक मिळवुन राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे.


बुधवार (दि.१८) मे २०२२ ला महाराष्ट्र राज्य तिरंदाजी असोसीएशन द्वारे हिंगोली येथील बरसत येथे राज्य स्तरीय तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील एकुण २४० तिरंदाज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. राज्य स्तरीय तिरंदाजी स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील प्रतिनिधीत्व केलेल्या कुर्वे आर्चरी क्लब नागपूर येथील तिरंदाज (Archer) जिनात राहुल गजभिये याने नऊ वर्षांवरील वयोगटात उत्कृष्ट काम गीरी करीत कास्य पदक प्राप्त करून राजामुंद्री (आंध्र प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत स्थान प्राप्त करित प्रवेश निश्चित केला आहे. स्पर्धेचे आयोज न रंगाराओ साळुंके हयानी केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनचे उपाध्यक्ष अँड.भिमराव गजभिये यांचा नातु जिनात मुळे नागपूरचे नाव हे राज्य पातळी वर चमकले असुन जिनात च्या यशामध्ये त्याच्या पाल कांचे आणि कुर्वे आर्चरी कल्ब नागपूरचे मुख्य प्रशिक्ष क देवीदास कुर्वे यांचा मौलाचा वाटा आहे. तसेत संदीप काळे, सत्यजीत सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र तिरंदा जी असोसिएशन्सचे सचिव प्रमोद चांदूरकर हयानी स्पर्धेचे संचालन आणि आभार प्रदर्शन रंगाराओ साळुंके हयांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गोंडेगाव कोळसा खदान चा , ट्रक मध्ये १० टन कोळसा चोरून नेताना पकडले.

Mon May 23 , 2022
गोंडेगाव कोळसा खदान चा, ट्रक मध्ये १० टन कोळसा चोरून नेताना पकडले. #) सुरक्षा अधिकारी च्या तक्रारीने पोस्ट कन्हान ला २ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून १६ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस १० कि मी अंतरावर गोंडेगाव खोल खुली खदान येथील कोळसा चोरी करून […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta