प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व आशावर्कसना औषधी व साहित्याची मदत : ग्रामोन्नती प्रतिष्ठाणाचा उपक्रम

प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व आशावर्कसना औषधी व साहित्याची मदत

#) ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी सेवाभावी उपक्रम. 

कन्हान : – शहर व परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व आशा वर्कस ना कोरोना विषाणु आजाराचा वाढत्या प्रादुभावात रूग्णाची सेवा करताना तुटपुंजी व्यवस्था बघता ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी व्दारे परिसरा तील रूग्णाची व नागरिकांची सेवा करताना अडचण होऊ नये यास्तव प्राथमिक आरोग्य केंद्रास महत्वाच्या औषधी व डॉक्टर, नर्स, कर्मचारी व आशा वर्कस याना आवश्यक साहित्य नैतिकता म्हणुन भेट देत सेवाभावी मदत करण्यात आली.  


            कन्हान परिसरात कोरोना चा प्रचंड प्रादुर्भाव  वाढत असुन अपु-या व्यवस्थेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. असंख्य कोरोना रुग्ण उपचारासाठी सैरा-वैरा जीव वाचवण्याचे युद्ध लढत असताना सर्वी कडे निराशाच, प्रचंड मरणाची दहशत, तर दुसरी कडे अपुरी-हतबल आरोग्य व्यवस्था, राजकीय पाप सर्व सामान्य नागरिकांनीच भोगावे का ? याचे उत्तर योग्य वेळी नागरिक देतीलच …..
        प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान-पिपरी शहरा सह गाडेघाट, जुनिकामठी, टेकाडी, कांद्री,सिहोरो,खंडाळा, निलज, बोरी, सिंगारदिप, गहुहिवरा गावातील मोठ्या लोक संख्येची आरोग्य व्यवस्था सांभाळीत आहे.कोरो ना विषाणु आजाराचा वाढत्या प्रादुभावात रूग्णाची सेवा करताना तुटपुंजी व्यवस्था अडसर बघता परिसरा तील नागरिकांचे आरोग्य, जिवन सुरक्षित करण्याच्या दुष्टीने लोकहितार्थ ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी व्दारे प्राथमिक आरोग्य केंद्रा कन्हानला ऑक्सीमीटर,  सॅनिटायझर, मास्क,हॅन्डग्लोज,फेसशिल्ड, जंतुनाशक,  कप सायरप महत्वाच्या औषधी आणि डॉक्टर, नर्स, कर्मचारी व २५ आशावर्कस याना सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज, फेसशिल्ड, किट, जंतुनाशक, कप सायरप आदी आवश्यक साहित्य प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री चरपे, श्री पवार यांच्या उपस्थितीत नैतिकता जपत भेट स्वरूपात सेवाभावी मदत करण्यात आली.

 याप्रसंगी ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव, दिलीप राईकवर, मोतीराम रहाटे, प्रविण गोडे, गोविंद जुनघरे, चंद्रशेखर कलमदार, गणेश भोंगाडे, अजय ठाकरे, निलेश गाढवे, सुनील सरोदे, वृषभ बावनकर, निशांत जाधव, केतन भिवगडे, प्रदीप गायकवाड, ऋृषभ दुधपचारे, बंटी डाफ आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान नदी रक्षाघाटावरील लोकांच्या गर्दीला प्रतिबंधात्मक निर्बंध  कोण लावणार ? 

Thu Apr 29 , 2021
कन्हान नदी रक्षाघाटावरील लोकांच्या गर्दीला प्रतिबंधात्मक निर्बंध  कोण लावणार ?  कन्हान : – परिसरात दिवसेदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढुन मुत्यु संख्येत वाढ होत असुन कन्हान नदीच्या रक्षाघाटावर नागपुर शहर व बाहेर गावातील लोकांच्या भयंकर गर्दी नदीत राख विसर्जन करताना होत आहे. तसेच त्यांना लागणा-या चाय, नास्ता,पिण्याचे पाणी व ईतर साहित्य रक्षाघाटा […]

You May Like

Archives

Categories

Meta