कत्तली करिता जाणारे २२ गोवंश ताब्यात तेरा लाख विस हजारांचा मुद्देमालासहीत आरोपींना अटक 

कत्तली करिता जाणारे २२ गोवंश ताब्यात

तेरा लाख विस हजारांचा मुद्देमालासहीत आरोपींना अटक

कन्हान, ता. ८ : बोर्ड टोल नाक्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून मालवाहू वाहनाला पकडून २२ गोवंश जनावरांना जीवदान दिले. दोन आरोपीला अटक करीत एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल कन्हान पोलिसांनी जप्त केला. एक आरोपींचा शोध सुरू आहे.

    मनसर येथून जबलपुर नागपूर हायवे रोडने पहाटे सकाळी सहा वाजता एम एच-४० सीडी १८९३ या क्रमांकाचे वाहन अवैधरित्या जनावरे कत्तली करिता निर्दयतेने कोंबून नेत असल्याची माहिती कन्हान पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून वाहनास ताब्यात घेतले. यात १० बैल आणि १२ म्हैस अशी २२ गोवंश निर्दयपणे बांधलेल्या स्थितीत आढळली. पोलीसांनी वाहनासहित १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी साकौर खान नजीम खान (वय २६), तुलसिदास तुलाराम (वय ३४) रा.(म.प्र.). दोघांना ताब्यात घेऊन फरार आरोपी जिया खान रा.कामठी एकाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी गोवंशांना गोवंश ध्यान फाउंडेशन खरबी नागपुर येथे दाखल केले. सदची कारवाई पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण व अपर पोलीस अधिक्षक नाग्रा, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी विभाग कामठी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, यांचे मार्गदर्शनात उमाशकर पटेल नापोशि आशीक कुंभरे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा तपास सफी गणेश पाल व सचिन वेळेकर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भारत शिक्षा रतन पुरस्काराने सन्मानित डॉ.आकाश बेले

Mon Oct 16 , 2023
भारत शिक्षा रतन पुरस्काराने सन्मानित डॉ.बेले नागपूर :   ऐकॉनॉमिक्स ग्रोथ फाऊंडेशन, नवी दिल्ली यांच्याकडून शैक्षणिक क्षेत्रातील समर्पण, अपवादात्मक योगदान, उल्लेखनीय कामगिरी आणि भूमिकेबद्दल, ऐकॉनॉमिक्स ग्रोथ फाऊंडेशन, दिल्ली द्वारे शिक्षकांना सन्मानित केले जाते. भारत शिक्षा रतन पुरस्कार 2023 मध्ये डॉ. आकाश जयदेवराव बेले यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.बेले हे […]

You May Like

Archives

Categories

Meta