रामसरोवर टेकाडी येथे आखाडा अभ्यास स्पर्धा व पत्रकारांचा सत्कार

रामसरोवर टेकाडी येथे आखाडा अभ्यास स्पर्धा व पत्रकारांचा सत्कार

कन्हान,ता.२३ जानेवारी

   गुरूकृपा मर्दानी आखाडा टेकाडी व्दारे रामसरोवर शितला माता मंदीर ये़थे टेकाडी, निमखेडा येथील शिवकला मर्दानी आखाडा (दांडपट्टा) खेडाळु चा एक दिवसीय अभ्यास व स्पर्धा घेऊन कन्हान च्या पत्रकारांचा सत्कार सोहळा पार पडला.


रविवार (दि.१५) जानेवारी ला सकाळी शिवसेना माजी खासदार मा.प्रकाश भाऊ जाधव यांचे अध्यक्षेत व प्रमुख अतिथी जेष्ट पत्रकार एन एस. मालविये सर, अजय त्रिवेदी, मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार यांचे हस्ते शितला माता, श्रीराम पादुका, छत्रपती शिवाजी महाराज, बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन, पुष्पहार अर्पन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

सर्व प्रथम मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करू न पारंपारिक शिव कालीन मर्दानी आखादा (दांड पट्टा ) १४ व १७ वर्ष आंत खेडाळुनी अभ्यास, प्रशिक्षण देत स्पर्धा घेऊन विजयी खेडाळुना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी मा.एन एस मालविये व माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यानी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि पारंपारिक शिव कालीन आखाडा, शस्त्र कला विषयी उपस्थिताना मार्ग दर्शन केले.

मान्यवराच्या हस्ते ग्रामि़ण पत्रकार संघ कन्हान चे मार्गदर्शक पत्रकार एन एस मालविये, अजय त्रिवेदी, अध्यक्ष मोतीराम रहाटे, कार्याध्यक्ष कमलसिंग यादव, सचिव सुनिल सरोदे, कोषाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सदस्य रोहीत मानवटकर, आकाश पंडीतकर, मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष धनजय कापसीकर, किशोर वासाडे आदीचा पेन, डॉयरी व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन निलेश गाढवे यांनी तर आभार वस्ताद मोहन जी वकलकर हयानी व्यकत केले. सहभोजनाने कार्य क्रमाची सांगता करण्यात आली. या एकदिवसीय कार्य क्रमाच्या यशस्वितेकरिता गुरूकृपा मर्दानी आखाडा टेकाडी अध्यक्ष निलेश गाढवे, वस्ताद मोहन वकलकर, दिनेश चिमोटे, प्रविण चव्हाण, किशोर गाडगे, केतन भिवगडे, अभिजीत चांदुरकर, सचिन ढोबळे, पंकज मोहाडे, प्रशांत टाकळखेडे, राजु बेले, वासुदेव नागोसे, नागोराव सहारे, सुरेश खोरे, चेतन मोहाडे, वासुदेव सातपैसे, विशाल सातपैसे, अनिकेत निमजे, ओम सात पैसे, आदेश आंबागडे, अमोल कांबळे, उज्वल कांबळे, मोहित सावरकर, पूर्वेश नाईक,सिद्धेश सातपैसे, निकिता बेले, प्राची टाकरखेडे, सोनम गुरधे, मोनाली आकरे, श्रेया हूड, निधी नाईक, राणी गुरधे सह ग्रामस्थानी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

एम.जी.नगर येथे भुंखडावर मालकी हक्क दाखवत अवैध कब्जा  न.प. व पो.स्टेशन कारवाही करत नसल्याचा पत्रकार परिषदेत आरोप 

Mon Jan 23 , 2023
एम.जी.नगर येथे भुंखडावर मालकी हक्क दाखवत अवैध कब्जा  न.प. व पो.स्टेशन कारवाही करत नसल्याचा पत्रकार परिषदेत आरोप कन्हान,ता.२३ जानेवारी     नगरपरिषद हद्दीतील तारसा रोड, एम.जी. नगर कन्हान येथे श्रीचंद शेंडे यांच्या मालकीच्या भुखंडावर दलजीत पात्रे यांनी‌ आपले मालकी हक्क बजावत अवैध बांधकाम केल्याने भुंखडावरील ताबा सोडण्यास सांगितले असता शिविगाळ […]

You May Like

Archives

Categories

Meta