कन्हान ला पारंपारिक सांस्कृतिक लोककला सोहळा थाटात साजरा विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे स्व.धर्मदास भिवगडे यांची व्दितीय पुण्यतिथी साजरी

कन्हान ला पारंपारिक सांस्कृतिक लोककला सोहळा थाटात साजरा

विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे स्व.धर्मदास भिवगडे यांची व्दितीय पुण्यतिथी साजरी

कन्हान,ता.११ ऑगस्ट

    भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय दिल्ली व विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान च्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती प्रित्यर्थ गुरुपुजा, सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार व स्व.धर्मदास भिवगडे यांची द्वितीय पुण्यतिथी कार्यक्रमासह पारंपारिक सांस्कृतिक लोककला सोहळा थाटात साजरा करण्यात आला.


गुरुवार (दि.१०) ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत कुलदीप मंगल कार्यालय, कन्हान येथे भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय न्यु दिल्ली व विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान च्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक लोककलेचा सर्वांगिण विकास तसेच नविन पिढीला जागृत करण्याच्या उद्देशाने विदर्भातील सर्व लोककलेच्या पथकांना मंच उपलब्ध करून दिले.

    पारंपारिक लोककलेचा प्रसार व प्रचार आणि जतन व्हावे यास्तव सतत कार्यरत असुन शासनाच्या विविध योजना राबवुन लोककलावंत हित जोपसण्यास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती प्रित्यर्थाने गुरू पुजा, सांस्कृतिक कार्यक्रम, जेष्ठ शाहिर व पत्रकारांचा सत्कार व द्वितीय पुण्यतिथी कार्यक्रमाचे राजेंद्र मुळक माजी मंत्री, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष नागपुर ग्रा.यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.

    प्रमुख अतिथी म्हणुन चंदपाल चौकसे पर्यटन मित्र, सौ.रश्मीताई बबलु बर्वे माजी जि प अध्यक्ष, शंकरराव चहांदे माजी नगराध्यक्ष, दयारामजी भोयर तालुकाध्यक्ष कॉग्रेस कमेटी, मनिष भिवगडे केंद्रिय अध्यक्ष वि.शा.क परिषद, अलंकार टेभुर्णे कार्याध्यक्ष, कुंबरेजी अध्यक्ष महाराष्ट्र, यादवराव कानोळकर विदर्भ अध्यक्ष, दयाल कांबळे जिल्हाध्यक्ष नागपुर, चुडामन लांजेवार जिल्हाध्यक्ष गोंदिया, पारधी जिल्हाध्यक्ष भंडारा आदींच्या उपस्थित सकाळी ९ ते १२ वाजता भंजन मडळीचे सादरीकरण, दुपारी १२ ते २ वाजता प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, जेष्ट शाहिर कला वंत व पत्रकार बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत उमरेड भिवापुर, नरखेड, कळमेश्वर, काटोल, रामटेक, मौदा, चिमुर, साकोली , नागपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपुर संपुर्ण विदर्भातील लोककलावंतानी खडी गंमत, दंडार , गोंधळ, कीर्तन, पथनाट्यासह विविध लोककला साद रीकरणातुन जनजागृतीचा संदेश देत लोककलावंतानी मनोरंजत्माक प्रबोधन करून श्रौत्याना मंत्रमुग्ध केले.

    विदर्भ शाहिर कलाकार परिषद केंद्रीय अध्यक्ष मनिष भिवगडे, कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे याच्या हस्ते सहभागी सर्व मंडळास व कलावंतांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुत्रसंचालन टेकाडी ग्रां.प सदस्य सतिश घारड यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्विते करिता अलंकार टेंभुर्णे, शाहीर दयाल कांबळे, शा.रामेश्वर दंडारे, शा.चुडामन लांजेवार , शा. उत्तम आशिर्वाद, शा. हिम्मतराव यावलकर, शा. रामकृष्ण कानोलकर, शा. वसंता कुंभरे, शा. गंगाधर निंबोने, शा. मनोहर धनगरे, शा. मानेराव गुरुजी, शा. ज्ञानेश्वर तायवाडे, शा. केशव नारनवरे, शा. राजकुमार गायकवाड, शा. हरिश्चंद्र कार्लेकर, महिला प्रतिनिधी सौ. ज्योतीताई वाघाये, सौ विद्या लंगडे सह विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्यानी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अवैधरित्या गोवंश कत्तलीकरिता नेताना बोलेरो पिकअप वाहनास संपादकाने पकडले कारवाईत १४ नग गौवंश व बोलोरो वाहनासह एकुण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

Sat Aug 12 , 2023
अवैधरित्या गोवंश कत्तलीकरिता नेताना बोलेरो पिकअप वाहनास संपादकाने पकडले कारवाईत १४ नग गौवंश व बोलोरो वाहनासह एकुण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कन्हान,ता.११ ऑगस्ट     पोलीस स्टेशन अंतर्गत खंडाळा शिवाराती ल महामार्गावर अवैधरित्या गौवंश कत्तलीकरिता बोलोरो पिकअप वाहनात भरून नेताना पोलीस टाई म्स न्यूज़ ईंडिया व न्युज […]

You May Like

Archives

Categories

Meta