लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ वी जयंती निमित्य युवक कॉग्रेस व्दारे वृक्षरोपन

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ वी जयंती निमित्य युवक कॉग्रेस व्दारे वृक्षरोपन

कन्हान,ता.०१ ऑगस्ट

    लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य नागपुर जिल्हा ग्रामिण व रामटेक विधानसभा युवक कॉग्रेस व्दारे कांद्री, कन्हान, पारशिवनी, रामटेक येथे वृक्षरोपन करून लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.

 

     मंगळवार (दि.१) ऑगस्ट ला लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ वी जयंती निमित्य रामटेक विधानसभा अंतर्गत प्रमुख शहरात नागपुर जिल्हा ग्रामिण युवक कॉग्रेस सचिव रोहित बर्वे व रामटेक विधानसभा युवक कॉग्रेस अध्यक्ष निखिल दा. पाटील, युवा नेते अजय कापसिकर यांच्या नेतुत्वात सर्व प्रथम संताजी नगर कांद्री येथील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार व मानवंदना अर्पण करून वृक्षरोपन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

   याप्रसंगी कांद्री माजी सरपंच बलवंत पडोळे, सिंदु वाघमारे, महेश झोड़ावने, राहुल टेकाम, महेश बावनकुले, जितेंद्र पांडे, सतिष भसारकर, महेश धोगडे, दुर्गेश शेंद्ररे आदी सह युवक काग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  गांधी चौक कन्हान येथील महात्मा गांधीजीच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून नगपरिषद कन्हान च्या आवारात वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी नगरपरिषद उपाध्यक्ष योगेश बाबु रंगारी, नगरसेविका रेखाताई टोहने, अमोलभाऊ प्रसाद, सतिशभाऊ भसारकर, महेश धोगडे, चंदन मेश्राम, दिलीप निंबोणे, दुर्गेश शेंदरे , मयुर नागपुरे, शैलेश पात्रे, ठाकुर गायकवाड, वर्मा लोंढे, पिंटु गायकवाड सह युवक कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या नंतर तहसिल कार्यालय पारशिवनी आणि नंतर रामटेक बस स्टाप चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार व आदाराजंली अर्पण करून परिसरात वृक्षरोपन करण्यात आले. अशा प्रकारे युवक कॉग्रेस व्दारे वृक्ष रोपन करून लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वाचनालय कामठी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Wed Aug 2 , 2023
वाचनालय कामठी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन कामठी,ता.०२ ऑगस्ट     साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त शाहिर राजेंद्र भिमराव बावनकुळे यांनी साहित्यसम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या छायाचित्रा ला माल्यार्पण करून अभिवादन केले.     साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर उज्वल रायबोले यांनी मार्गदर्शन केले. […]

You May Like

Archives

Categories

Meta