श्रीसंत सीताराम माहाराज देवस्थानात श्रावणमास अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

श्रावणमास अखंड हरिनाम सप्ताह संपन्न
सावनेर: श्रीसंत सीताराम माहाराज देवस्थान सावनेरचा वतीने श्रावणमास अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रावण शुद्ध षष्ठी ते श्रावण शुद्ध त्रयोदशी  22 ऑगस्ट ते 29 ऑगस्टला साजरा करण्यात आला.
या हरिनाम सप्ताहात श्रावण शुद्ध षष्ठीला श्रीचा अभिषेक,पूजा अर्चना करुण सप्ताहाला प्रारंभ झाला.
सतत ८ दिवस चलणाऱ्या सप्ताहात दैनंदीन पहाटे काकड़ा,सकाळी आरती, दुपारी भजन, सायंकाळी हरिपाठ,रात्री भजन अश्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


या सप्ताहात दररोज नागरितील अन्नदात्यांकडून अन्नदान संपन्न झाले.शहरातील प्रत्येक समाजाचा वतीने दररोज अखंड श्रीचा पाहरा व भजन संपन्न झाले.सप्ताहाचा शेवटला दिवस म्हणजे 29 ऑगस्ट श्रावण शुद्ध त्रयोदशीला सकाळी ठीक 7 वाजता श्रीची विधिवत पूजा अर्चना करुण सकाळी ठीक 9 ते 11  श्रीसंत सीताराम महाराज देवस्थान भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
दुपारी ठीक 12 वाजता समस्त भजनी व भविकासह टाळ मृदुंगचा गजराज श्रीची पालखी कोलार नदीच्या तिरावर दहिलाही संपन्न झाली. नंतर देवस्थानात महाप्रसादाचा कार्यक्रम सुरवात झाली.
सायंकाळी ठीक 5 वाजता श्रीसंत सीताराम महाराज देवस्थान येथून
समस्त भजनी मंडळीसह टाळ मृदुंगाचा गजरात श्रीची पालखी शोभायात्रा मुख्य मार्गणी नगर भ्रमनाकारिता काढण्यात आली. ठीक ठिकाणी श्रीचा पालखीचे पूजान करण्यात आले.तर मुख्य मार्गावर सडा रंगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात आले.असंख्य भाविकांनी या पालखी शोभायात्रेत सहभाग घेतला
संपूर्ण कार्यक्रमचा यशस्वितेकरिता  समस्त देवस्थान कमिटी व नगर वासीयांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोठेकर कुटुंबाला नोकरी व भरपाई देऊन न्याय देण्याची मागणी शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन

Thu Aug 31 , 2023
कोठेकर कुटुंबाला नोकरी व भरपाई देऊन न्याय देण्याची मागणी शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन कन्हान,ता.३१     वेकोलि कोळसा खदान च्या ब्लास्टिंगमुळे एक घर कोसळल्याने सहा वर्षाची मुलगी कु.यादवी आणि कमलेश कोठेकर या बापलेकीचा मलब्यात दबुन दुर्देवी मृत्यु झाला. ही घटना सोमवार रोजी दुपारी हरीहर नगर कांद्री येथे […]

You May Like

Archives

Categories

Meta