कोव्हीड-१९आजाराचा वैद्यकीय प्रतिपुर्तिच्या यादित समावेश करावा : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

*कोव्हीड-१९आजाराचा वैद्यकीय प्रतिपुर्तिच्या यादित समावेश करावा

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

कन्हान ता.27 सप्टेंबर शासकीय कर्मचारी तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तिच्या मंजुरी संदर्भात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सेवा देखभाल नियम १९६१ व त्या संदर्भात वेळोवळी निर्गमित संदर्भ शासननिर्णया मधील तरतुदीच्या आधीन राहून आकस्मिक उद्भवणाऱ्या २७आकस्मिक ५ गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचारांवरील खर्चाची प्रतीपुर्ती वैद्यकीय देयकाद्वारे करण्यात येते.
सध्या कोरोना महामारीचे संकट संपुर्ण महाराष्ट्र भर आहे. शासकीय अधिकारी /कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्मचारी या महामारीच्या निर्मुलनासाठी विविध पातळीवर जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहेत. त्यातून अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे.शासकीय कर्तव्य पार पडतांना रोगाची लागण झाल्यास सध्या बेडचा तुटवडा व इतर अत्यावश्यक बाबीसाठी कर्मचाऱ्यांना पर्यायी खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. कोव्हीड -१९आजाराचा वैद्यकीय प्रतिपूर्ती साठी शासनाने विर्निदिष्ट आजारामध्ये समावेश नसल्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्ती अंतर्गत सद्यस्थितीत गंभीर आजाराच्या यादीत कोव्हीड -१९चा समावेश करावा अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचेकडे केली.आहे.
याव्यतिरिक्त सारी, स्वाईन फ्लू, लिव्हर प्रत्यारोपण, डेंग्यू, सोरायसिस इ. रोगांचा समावेश करण्याबाबत विनंती केली आहे.या मागणीचे स्वागत गोपाळराव चरडे,रामुजी गोतमारे,सुनीलची पेटकर,सुभाषजी गायधने,डी.व्ही.वंजारी,प्रकाश बांबल,धनराज बोडे,आनंद गिरडकर, निलेश राठोड,पंजाब रोठोड,लोकेश सुर्यवंशी, दिलीप जिभकाटे,उज्वल रोकडे,अशोक बावनकुळे,आशा चिखले,सिंधु टिपरे,वंदना डेकाटे,सुनंदा देशमुख, नंदा गिरडकर, श्वेता कुरझडकर, हरिश्चंद्र रेवतकर,मनोज बोरकर,तुषार चरडे,गाढवे,वसंत बलकी,महिपाल बनगैया,संतोष बुधबावरे,विलास वनकर,अर्जून धांडे,अशोक हटवार,अनिल पाटील,चंद्रशेखर वाघ व इतर पदाधिकारी यांनी केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पाराशिवनी तालुकाचे दहा ग्राम पंचायती वर प्रशासक नियुक्ती : बिडीओ बमनोटे

Sun Sep 27 , 2020
*पाराशिवनी तालुकाचे दहा ग्राम पंचायती वर प्रशासक नियुक्ती बिडीओ बमनोटे यांची माहीती* कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी (ता प्र):-महाराष्ट्र ग्राम पंचायत  सुधारणा अध्यादेश २०२० अन्वये महाराष्ट्र ग्राम पंचायत आधिनियम कलम १५१मधिल पोट कलम (१)मध्ये खंड (क) मध्ये परंतुका नंतर जर नैसार्गिक आपत्ती किवां प्रशासाकिय अडचणी किंवा महामारी ईत्यादी मुळे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta