रस्त्यावरील कुत्रे निर्दयपणे मारून, क्रुतेने वाहनात भरून नेणा-या विरूध्द गुन्हा दाखल घटनेचा विडिओ वायरल झाल्याने आर.ए.डी संस्थे व्दारे दखल 

रस्त्यावरील कुत्रे निर्दयपणे मारून, क्रुतेने वाहनात भरून नेणा-या विरूध्द गुन्हा दाखल

घटनेचा विडिओ वायरल झाल्याने आर.ए.डी संस्थे व्दारे दखल 

कन्हान, ता. २९ फेब्रुवारी 

   नगरपरिषद अंतर्गत रस्त्यावरील कुत्र्यांना निर्दयपणे मारून रक्त बंबाळ अवस्थेत कुरतेने चारही पाय व तोंड बांधुन वाहनात टाकुन नेणा-याचा विडिओ वायरल झाल्याने आरएडी बहुउद्देशिय संस्थेच्या तक्रारी वरून कन्हान पोस्टे ला कंत्राट देणारे, कंत्राट घेणारा कंत्राटदार व वाहन चालक विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

 

   बुधवार (दि.२८) फेब्रुवारी कन्हान नगर परिषद परीसरात रस्त्यावरील कुत्र्यांना बेदम मारहाण करून रक्त बंबाळ स्थितीत क्रुरतेने त्यांचे चारही पाय, तोंड बांधुन नविन नगरपरिषद इमारती सामोर टाटा एस मिनी ट्रक क्र.एमएच ३१ सीबी ५९३२ या वाहनात भरून नेणा-यांचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आर ए डी बहुउद्देशिय संस्थाचे अंकीत निलकंठ खळींदे रा. वाठोडा नागपुर यांनी घटना स्थळी पोहचुन प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.

  या प्रकरणी दोषी कंत्राट देणारे, कंत्राट घेणारे व वाहन चालक अशा सर्वावर गुन्हा दाखल करून त्यांनी त्या मुक्या प्राणी कुत्र्यांना जिथेही नेऊन सोडले असेल तेथुन परत आणुन त्याचा उपचार करून पुर्वरत अधिवासात सोडण्यात यावे, तसे न केल्यास प्राणी हत्येचा सुध्दा गुन्हा दाखल करण्याच्या तक्रारी वरून कन्हान पोस्टेला दिनेश दिवाकर राऊत (वय ३२) रा. रामनगर पिपरी, हरिश जयराम तिडके (वय ४०)  शिवाजी नगर, कन्हान, अजय बकाराम चव्हाण (वय ४८) रा. पिपरी कन्हान यांचे विरूध्द कलम ११९ प्राण्यांना कुरतेने वागवणुक मुंबई पोलीस अधिनियम १९६० कायदा, ४२८, ३४ भादंवि अन्वये नुसार गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेऊन पुढील तपास ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शाहीर कलाकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाची तयारी - शा. राजेन्द्र बावनकुळे  संतांची संयुक्त जयंती व भव्य कलाकार मेळाव्यात लोककलावंत व पत्रकारांचा सत्कार

Sun Mar 3 , 2024
शाहीर कलाकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाची तयारी – शा. राजेन्द्र बावनकुळे  संतांची संयुक्त जयंती व भव्य कलाकार मेळाव्यात लोककलावंत व पत्रकारांचा सत्कार कन्हान, ता. ०३ मार्च      भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया व्दारे छत्रपती शिवाजी महाराज, श्री विश्वकर्मा, संत गाडगे बाबा, संत रविदास व लोकशाहीर वस्ताद […]

You May Like

Archives

Categories

Meta