शाहीर कलाकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाची तयारी – शा. राजेन्द्र बावनकुळे  संतांची संयुक्त जयंती व भव्य कलाकार मेळाव्यात लोककलावंत व पत्रकारांचा सत्कार

शाहीर कलाकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाची तयारी – शा. राजेन्द्र बावनकुळे 

संतांची संयुक्त जयंती व भव्य कलाकार मेळाव्यात लोककलावंत व पत्रकारांचा सत्कार

कन्हान, ता. ०३ मार्च 

    भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया व्दारे छत्रपती शिवाजी महाराज, श्री विश्वकर्मा, संत गाडगे बाबा, संत रविदास व लोकशाहीर वस्ताद स्वर्गीय भिमराव बावनकुळे यांची संयुक्त जयंती उत्सव व भव्य कलाकार मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमा सह भजन मंडळी, शाहीर कलाकार आणि पत्रकारांचा सत्कार सोहळा थाटात पार पडला.

    शुक्रवार (दि.१) मार्च ला कुलदीप मंगल कार्यालय रायनगर, कन्हान येथे सकाळी ११ वाजता संतांची संयुक्त जयंती उत्सव व भव्य कलाकार मेळाव्याचे उदघाटक युवा कांग्रेस रोहित नरेश बर्वे व पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया अध्यक्ष, सदस्य वृध्द कलावंत मानधन समिती नागपुर, आकाशवाणी व कैसेट सिंगर शाहिर राजेंद्र बावनकुळे यांचे अध्यक्षेत जंयती उत्साहात घेण्यात आली.

   प्रमुख अतिथी माजी आमदार देवराव रडके, जि प सदस्य व्यंकटेश कारेमोरे, शिवसेनेचे राधेश्याम हटवार, चंद्रशेखर अरगुल्लेवार, सौ योगिता नंदनवार, शाहीर डी मेश्राम, शा. ब्रम्हा नवघरे, विक्रम वांढरे, शांताराम जळते, नाना ठवकर, प्रेमलाल भोयर, पंढरी जैंजाड, वामन देशमुख, नरेंद्र महल्ले, शिशुपाल अतकरे, नरहरी वासनिक सह शाहिर कलाकारांच्या हस्ते संतांच्या प्रतिमेचे तसेच स्वर्गीय वस्ताद भिमराव बावनकुळे यांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. शाहिर कवी वांढरे यानी प्रास्ताविकातुन कार्यक्रमाची माहिती स्पष्ट केली.

  यावेळी मान्यवरांनी संतांच्या व स्वर्गीय भिमराव बावनकुळे यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

  याप्रसंगी युवा शाहीर आर्यन अंबादास नागदेवे, प्रदीप कुरेकर पाटील यांचा विशेष सत्कार करून शाहिर कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम विविध भजन, पोवाडे, डाहाका, गीत सादर करुन उपस्थिताना मंत्रमुग्ध करित मेळाव्यात रंगत आणली.

  तदंतर शाहिर कालाकार व पत्रकार अजय त्रिवेदी, मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, सुनिल सरोदे, नितीन रावेकर, ऋषभ बावनकर, रविंद्र दुपारे, दिलीप मेश्राम, आकाश पंडितकर, निलेश गाढवे आदीना शाॅल, सम्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन संतांची संयुक्त जयंती व भव्य कलाकार मेळावा थाटात साजरा करण्यात आला.

  भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया सदैव शाहिर लोककलावंताच्या न्याय हक्का करिता कार्य करित असुन शासना व्दारे शाहिर लोककलावंताच्या प्रलंबित मागण्या पुर्ण न झाल्याने आमरण उपोषण सुध्दा करणार अशा इशारा अध्यक्षीय मार्गदर्शनातुन शाहिर राजेंद्र बावनकुळे यांनी दिला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवराज अडकणे यांनी तर आभार शाहीर भगवान लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमास विदर्भातील शाहिर लोककलावंत मोठया संख्येने सहभागी झाले होते.

   कार्यक्रमाच्या यशस्विते करिता शाहिर मोरेश्वर बडवाईक, नत्थुजी चरडे , चिरकुट पुंडेकर, राजेंद्र लक्षणे, भुपेश बावनकुळे, गजानन वडे, रविंद्र मेश्राम, सुभाष देशमुख, रविंद्र दुपारे, प्रभाकर भोयर, वीरेंद्र शेंगर, गिरिधर बावणे, लीलाध र वडांद्रे, प्रफुल भनारे, विमल शिवारे, सिंधु चौहान, अरूणा बावनकुळे, महादेव पारसे, श्रावण लांजेवार, नितीन लांजेवार, लक्ष्मण चकोले, कैलाश कारेमोरे आदी सह बहु संख्येने शाहिर कलाकार, लोक कलावंतानी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नवीन संचमान्यतेचे निकष रद्द करा-अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

Sat Mar 23 , 2024
नवीन संचमान्यतेचे निकष रद्द करा-अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी कन्हान,ता.२२ मार्च       राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची संचमान्यता करताना सुधारीत निकष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पुर्ण शिक्षणावर गंभीर परिणाम होण्याची भिती व्यक्त करण्यात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta