अज्ञात वाहनाच्या धडकेत कामगाराचा मृत्यु

अज्ञात वाहनाच्या धडकेत कामगाराचा मृत्यु

कन्हान,ता.२१ डिसेंबर

      पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळ शिवार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर कन्हान नदी पुला जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यु झाल्याने पोलीसांनी अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

    पोलिसांच्या माहिती नुसार, मंगळवार ,(दि. १९) डिसेंबर पो.ह. जयलाल सहारे पोस्टे ला ड्युटीवर हजर असतांना सायंकाळी ७:१४ वाजता च्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ रोड वरील कन्हान नदीच्या पुला जवळ अज्ञात वाहनाने एकाचा अपघात झाला असुन मृत अवस्थेत पडुन आहे. मिळालेल्या माहिती नुसार, जयलाल सहारे आपल्या स्टाॅप सह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेथे एक इसम मृत अवस्थेत रोडावर पडलेला असुन सदर मृतकाच्या प्रेताची पाहणी केली. त्याचा डोक्यातुन व पायातुन रक्त निघत असल्याने त्याचा डोक्यावरुन आणि पाया वरुन वाहन गेल्याचे दिसुन आले. सदर मृतकाची तपासणी केली. त्याचा जवळुन कोणतेही ओळखपत्र व कागजपत्र प्राप्त न झाल्याने घटनास्थळा वर च्या परिसरातील लोकांना विचारफुस केली. त्यांचा कडुन माहिती पडले कि सदर इसम हा नेरी शिवारातील ईट भट्टीवर काम करणारा आहे. यावरुन सदर ठिकाणी जाऊन मृतक इसमाची फोटो दाखवुन माहिती विचारली. तेथील काम करणाऱ्या सुपरवाइजर शंकर शिवपुजन राॅय याने फोटो पाहुण सांगितले कि, इसमाचे नाव पप्पु मातादिन सरोज(वय -४५) रा.सरई ,नरहर पीयरीया, प्रतापगड ,उत्तर प्रदेश‌ असून नेरी, कामठी येथे इट भट्टीवर काम करण्याकरिता आला. त्याचा सोबतचा मजदुर दिसत नसल्यामुळे त्याला पाहण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ रोड कडे गेला होता. अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन इसमाला धडक देऊन. अज्ञात वाहन चालक वाहना सह पळुन गेल्याने पोलीसांनी जयलाल सहारे यांचा तक्रारी वरून अज्ञात वाहन चालका विरुद्ध कलम २७९ , ३०४ ए , १८४ , १३४(ए) ,१३४(बी) भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तलवार घेऊन धुमाकुळ घालणाऱ्याला अटक

Fri Dec 23 , 2022
तलवार घेऊन धुमाकुळ घालणाऱ्याला अटक कन्हान,ता.२२ डिसेंबर ‌‌  पोलीस स्टेशन अंतर्गत प्रगती नगर, सुपर टाऊन, कन्हान येथे अवैधरित्या तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकुळ घालत फिरणारा आरोपी जिगर कनोजिया याला स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक पोलीसांनी पकडुन त्यांच्या जवळुन तलवार जप्त करून त्यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले. […]

You May Like

Archives

Categories

Meta