एसंबा-वाघोली रोडवर ट्रकच्या धडकेत वन प्राणी हरिणाचा मृत्यु

एसंबा-वाघोली रोडवर ट्रकच्या धडकेत वन प्राणी हरिणाचा मृत्यु

कन्हान : – पारशिवनी तालुकातील एसंबा-वाघोली  रोड वरून रात्रीला अवैद्य कोळसा व रेती वाहतुक करणारे टँक्टर, ट्रक चोरीने बिनधास्त धावत असल्याने पहाटे सकाळी एका ट्रक चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे वेगाने चालवुन रस्ता पार करणा-या वन प्राणी हरिणाला जोरदार धडक मारून पळुन गेल्याने हरिणाचा घटनास्थळीच मृत्यु झाला. ही माहिती वन विभाग व कन्हान पोलीसाना दिल्याने पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुत हरिणाला अज्ञात दोन व्यकती हरिणाला शेतात घेऊन जाताना वनमजुरास दिसल्याने ते दोघेही मुत हरिणाला शेतात सोडुन पळुन गेले. मुत हरिणाचा पंचनामा करून पुढील तपास वन विभाग व पोलीस स्टेशन कन्हान करित आहे. 

                वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान व गोंडेगाव, घाटरोहणा, एंसबा परिसरात अवैद्य कोळसा व रेती चोरीचा धंदा बिनधास्त सुरू असुन असामाजिक तत्वाची मंडळी अवैद्य कोळसा व रेतीची वाहतुक पहाटे सकाळी टँक्टर, ट्रकने एंसबा ते वाघोली या मध ल्या रोडने नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा ने रामटेक, नागपुर कडे करित असल्याने रविवार (दि. २७) ला पहाटे सकाळी ४ ते ५ वाजता दरम्यान अश्या च एका ट्रक चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे वेगाने चालवुन एंसबा-वाघोली रोडवरील नाग मंदीर जवळील वळणावर रस्ता पार करणा-या एका हरिणा ला जोरदार धडक मारून पळुन गेल्याने हरिणाचा घटनास्थळी मुत्यु झाला. घाटरोहणा-एंसबा ग्रा प सदस्य अतुल गोरले यांना रोड वर हरिणाचा ट्रकच्या धडकेत रक्त स्त्राव होऊन मुत पावल्याचे दिसल्याने त्यानी वन विभाग पटगोवारी व पोलीस स्टेशन कन्हान ला माहीती दिल्याने बखारी येथील वन मजुर ज्ञानेश्वर खंडाते, लिलाधर ठाकरे हे वरिष्ठाच्या आदेशाने घटनास्थळी पोहचले तर पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात दोन व्यकती मुत हरिणाला शेतातुन ओढत घेऊन जाताना दिसल्याने पाठ लाग केला असता ते मुत हरिणाला शेतात सोडुन पळुन गेले. पटगोवारी वन विभागाचे वनरक्षक श्रीकांत टेकाम हयांनी वनमजुर भोंडेकर ला सामोर पाठविले. कन्हान पोस्टे चे पोहवा मोहन शेळके, नापोशि सुधिर चव्हाण, चालक जितेंद्र गावंडे आदीने घटनास्थळाचे निरिक्षण करून भोला कांबळे च्या शेतातील मृत हरिणाला बखारीचे वनमजुर ज्ञानेश्वर खंडाते, लिलाधर ठाकरे यानी घटनास्थळी आणुन पंचनामा करून आपल्या ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही वन विभागाचे वन रक्षक श्रीकांत टेकाम, वनमजुर भोंडेकर हे करीत आहे. याप्रसंगी घाटरोहणा(एंसबा) ग्रा प सदस्य अतुल गोरले, गोपाल गि-हे, नांदगाव उपसरपंच सेवक ठाकरे, धर्मदास उके, गोपाल तिरकमठे, लक्ष्मीकांत काकडे,  अजय ठाकरे, अधिकरण सुर्यवंशी, कुंदन ठाकरे,  निखिल गि-हे सह एंसबा, नांदगाव, वाघोली चे शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी एंसबा, वाघोली च्या नागरिकांच्या ये-जा करण्या-या गाव रस्त्या वरून कोळसा, रेती च्या टँक्टर, ट्रक ची वाहतुक बंद करण्या ची मागणी चर्चेतुन करण्यात येत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान नदी पुलावर चारचाकी वाहनाची दुचाकी ला धडक, दोन युवक जख्मी

Mon Feb 28 , 2022
कन्हान नदी पुलावर चारचाकी वाहनाची दुचाकी ला धडक, दोन युवक जख्मी कन्हान : – दुचाकी वाहनाने डब्बल सीट कामठीकडे जाणा-या दुचाकी ला समोरून येणा-या चारचाकी कार वाहनाने धडक मारून झालेल्या अपघातात दुचाकी चालक व मागे स्वार गंभीर जख्मी झाल्याने नागपुर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असुन अज्ञात कार वाहन चालकावर […]

You May Like

Archives

Categories

Meta