पोलीस चौकी सुरू करून वाहतुक पोलीस नेमण्यात यावा

पोलीस चौकी सुरू करून वाहतुक पोलीस नेमण्यात यावा

कन्हान,ता 23 जुलै 

     तारसा रोड चौक येथे असलेलेली पोलीस चौकी चारपदरी सिमेंट महामार्ग निर्माण कामात तोडण्यात आली. तेव्हा पासुन नव्याने  बनविण्यात न आल्याने चौकातील वाहतुक पोलीस सुध्दा हलविण्यात आले. असल्याने या वर्दळीच्या चौकात वाहन चालक आपली वाहने निष्काळजीने चालवित असल्याने येथे अपघात नेहमी होऊन निर्दोष लोक अपघाताचे बळी पडत आहे. यामुळे त्वरित तारसा रोड चौकात पोलीस चौकी बनवुन वाहतुक पोलीसाची नेमणुक करून दररोज तैनात ठेवण्यात यावा.
ऑटोमेटीव्ह चौक ते टेकाडी बस स्टॉप पर्यंत राष्ट्रीय चारपदरी सिमेंट रस्ता बांधकामात कन्हान शहरातील मुख्य तारसा रोड चौकात असलेली पोलीस चौकी तोडण्यात आली. या रस्त्याचे बांधकाम होऊन कित्येक दिवस होऊन सुध्दा चारपदरी सिमेंट रस्ता निर्माण कंपनी व्दारे तोडलेली पोलीस चौकी अद्याप बनविण्यात न आल्याने कन्हान पोलीस स्टेशन च्या वाहतुक पोलीसाची येथे डयुटी लावण्यात येत नाही. कोरोना संसर्गाने  मागील दोन वर्ष शाळा, महाविद्यालय बंद असुन वाहतुक सुध्दा कमी प्रमाणात होती. परंतु सध्या सर्व पुर्वरत होत रस्त्यानी वाहतुक चांगलीच वाढली आहे. या चौका जवळच शाळा, विद्यालये व बस स्टाॅप असल्याने नागपुर, रामटेक ला जाणा-या विद्यार्थ्याची चांगलीच वर्दळ दिवसभर असते. येथे वाहतुक पोलीस राहत नसल्याने वाहने रस्त्यावर कशी ही उभी ठेवतात. बाजाराची स्थाई जागा नसल्याने रस्त्यावरच दुकाने लागुन चारपदरी महामार्ग अरूंद होऊन वाहन चालकाना तारसा रोड चौक ते आंबेडकर चौकातुन आपली वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने दररोज येथे अपघात होतात. अशीच परिस्थिती राहल्यास मोठया अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे तारसा रोड चौकात पोलीस चौकी बनवुन नियमित दिवसभर वाहतुक पोलीसाची नेमणुक करण्यात यावी. अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या चर्चेतुन सामोर येत आहे. यास्तव त्वरित संबधित प्रशासनाने तारसा रोड चौकात पोलीस चौकी बनवुन वाहतुक पोलीसाची नेमणुक करावी. जेणे करून या चौकातील अपघातावर अंकुश ठेवता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

विद्यार्थी व महिला,पुरूष कामगारांना छत्री वाटप

Sat Jul 23 , 2022
विद्यार्थी व महिला,पुरूष कामगारांना छत्री वाटप कन्हान, ता.23 जुलै     अग्रेसर महिला मंडळ नागपुर (सुरभी) व जुनीकामठीचे माजी उपसरपंच ग्रा.प. सदस्य भुषण इंगोले यांचा संयुक्त विद्यमाने ग्राम पंचायत परिसरात आणि श्री क्षेत्र कामठेश्वर मंदीर येथे पावसाळ्यात गरीब गरजु विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व शेतकरी, कामगार, गाई म्हशी चारण्यारे आदी गरजुना […]

You May Like

Archives

Categories

Meta