कंटेनर ट्रक ने दुचाकी वाहनास जोरदार धडक, दुचाकी चालकांचा घटनास्थळीच मुत्यु

कंटेनर ट्रक ने दुचाकी वाहनास जोरदार धडक, दुचाकी चालकांचा घटनास्थळीच मुत्यु

कन्हान : – परिसरातील गहुहिवरा रोड अंडर पुला जवळ एका कंटेनर ट्रक चालकाने दुचाकी वाहन ला जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक सतिश श्रोते चा घटस्थळीच मृत्यु झाल्या ने कन्हान पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी ट्रक चालकास ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.२४) मे ला सायंकाळी ६:३० ते ७ वाजता दरम्यान मृतक सतिश धनराज श्रोते वय ४५ वर्ष राह. चाचेर हा कन्हान वरून चाचेर ला अक्टीवा मोपेड दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० एजे ८४३० ने चाचेर ला जात असतांना गहु हिवरा मार्गाने कन्हान कडे येणाऱ्या कंटेनर ट्रक क्रमांक एन एल ०१ एबी ६२६१ चा चालक राधेश्याम नंदकिशोर खटीक ह्याने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन समोरून येणा-या अँक्टीवा मोपेड दुचाकी वाहन चालकाला ज़ोरदार धडक मारून अंदाजे १०० मीटर घासत नेल्याने दुचा की वाहन चालक इसमाचा घटनास्थळीच मृत्यु झाल्या ने काही वेळेकरिता नागरिकांत रोष असुन तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस हेंड काॅस्टेबल मोहन शेळके व मंगेश सोनटक्के यांनी घटनास्थळी पोहचुन वातावरण शांत केले व घटना स्थळाचा पंच नामा करून मृतदेह ताब्यात घेऊन कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदना करिता पाठविण्यात आले असुन ट्रक चालकास ताब्यात घेऊन कन्हान पोलीस स्टेशन ला आणले. घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनचे हेंड काॅस्टेबल मोहन शेळके व मंगेश सोनटक्के हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

खासदार क्रीडा महोत्सवात बी.के.सी.पी.स्पोर्टस एकेडमी कन्हान चे उत्कुष्ट प्रदर्शन

Tue May 24 , 2022
खासदार क्रीडा महोत्सवात बी.के.सी.पी.स्पोर्टस एकेडमी कन्हान चे उत्कुष्ट प्रदर्शन #) स्वर्ण पदक १५, रजत पदक ११, कांस्य पदक १६ असे ४२ पदक प्राप्त केले. कन्हान : – “खासदार क्रीडा महोत्सव २०२२” अंतर्गत विविध एथलेटिक्स स्पर्धेत कन्हान शहरातील बी.के. सी.पी. स्कुल स्पोर्ट्स एकेडमी कन्हान च्या खेडाळुनी कला कौसल्य सादर करित उत्कृष्ट […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta