दखने शाळेत पाठ्यपुस्तक वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न 

दखने शाळेत पाठ्यपुस्तक वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कन्हान, ता.२१ जूलै

   अखिल भारतीय पुलक मंच परिवार आणि राष्ट्रीय जैन महिला जागृति मंच शाखा महाल, नागपुर यांचा संयुक्त विद्यमाने बळीरामजी दखने हायस्कुल, कन्हान येथे विद्यार्थांना पाठ्यपुस्तक वितरण करून परिसरीत वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

       मंगळवार (दि.१८) जुलै मुख्याध्यापिका सौ.विशाखा ठमके बळीरामजी दखने हायस्कुल, प्रमुख अतिथी नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर, अखिल दिगंम्बर जैन सैतवाल संस्थेचे राष्ट्रीय महामंत्री व दिगंम्बर जैन महासमिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नितिन नखाते, पुलक मंच परिवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोज बंड, राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच राष्ट्रीय कार्याध्यक्षा डॉ. रिचा जैन, पुलक मंच परिवार महाविर वार्ड अध्यक्ष सुजर जैन उपस्थित होते.

      मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थांना शिक्षणा विषयी मार्गदर्शन करुन पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. यानंतर शाळेच्या प्रांगणात ठिकठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष लाऊन वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका सौ.भाग्यश्री नखाते तर आभार वरिष्ठ शिक्षक सचिन अल्हडवार सर यांनी केले. प्रसंगी उल्हासजी जैन, डॉ.जितेंद्र गडेकर, राजेंद्र सोनटक्के, बळीरामजी दखने हायस्कुल शाळेचे पर्यवेक्षक ज्ञानप्रकाश यादव, क्रिडा शिक्षक माधव काठोके, संजय आगरकर, रमेश उदेपुकर, दिलीप सावळकर, जितेंद्र जैन, राजेंद्र बंड, मनोज मांडवगडे , प्रितीताई जैन, सविताताई मांडवगडे, नयनाताई उमाळे, जयाताई गडेकर, राधाताई काटोलकर, रश्मीताई सोनटक्के सह शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मुलगा "आरुष" ला शिव्या दिल्याचा वादातुन युवकाची हत्या चौथा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी अटक

Fri Jul 21 , 2023
मुलगा “आरुष” ला शिव्या दिल्याचा वादातुन युवकाची हत्या चौथा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी अटक कन्हान,ता.२१ जूलै      कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर शिवार येथील शितला माता मंदिरा जवळ “आरुष” ला शिव्या दिल्याचा वादातुन भरदिवसा युवकाची हत्या केल्याने नागरिकांन मध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.       […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta