11 गोवंशला जीवनदान व 7,65,000/- रूपयाचा मुद्देमालसह जप्त : कन्हान पोलिसांची कारवाई

11 गोवंशला जीवनदान व 7,65,000/- रूपयाचा मुद्देमालसह जप्त


कन्हान ता.18 : पोलिस स्टेशन कन्हान परीसरातील सींगोरी बोरी तारसा फाट्यावर ( दि.18) रविवार रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान गुप्त माहीतीवरून नाकाबंदी करून 11 गोवंशला जीवनदान देऊन व एकूण 7,65,000/- रूपयाचा मुद्देमालसह जप्त करण्यात आला.
संजय बरोदीया यांचा माहीतीनुसार कन्हान शहरात अंतर्गत सींगोरी बोरी तारसा फाटा रोडनी नागपुर मार्गे घेऊन जात असलेल्या वाहन क्र. 27-BX-3457 थांबविले असता त्यामध्ये ११ गोवंशाचे चारही पाय व तोंड दोरीने बांधुन त्यांना क्लेशदायक वागणुक देवुन त्यांची कोणतीही चारापाण्याची व्यवस्था न करता वाहनामध्ये कोंबुन त्यांना कत्तल करण्याकरीता घेवुन जाताना मिळुन आल्याने सदर वाहन चालक वाहन घटनास्थळी सोडुन फरार झाला असुन व यामध्ये असलेले. 11 मुक्या गोवंशला जीवनदान देत यातील एकुण किंमती 7,65,000/-रूपचा मुद्देमालसह जप्त करून गुन्हा दाखल केला.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक राकेश ओला नागपुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामिण, उपविभागिय पोलीस अधिकारी , कामठी विभाग कामठी यांचे मार्गदर्शनाखाली सुजीकुमार क्षीरसागर, परि पो.उप अधिक्षक, पोहवा जयलाल सहारे, नापोशी राहुल रंगारी, कृणाल पारधी पोशि ,संजय बरोदिया, सुधिर चव्हाण, शरद गिते. मुकेश वाघाडे, सतीश तादळे, निसार शेख, जितेंद्र गावडे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सचिव हरिदास रानडे यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध

Thu Apr 22 , 2021
*टेकाडी ग्रा पं चे सचिव हरिदास रानडे यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध* कमलसिंह यादव पारशिवनी तालुका प्रतिनिधी *पारशीवनी* (ता प्र):- पोलीस पाटील संघटना , महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने पारशिवणी तालुक्यातील टेकाडी(को ख) ग्रामपंचायत चे व्ही. डी. ओ.(ग्राम सचिव)श्री. हरिदास रानडे […]

You May Like

Archives

Categories

Meta