कन्हान नदीत बुडालेल्या मुलाचा मुतदेह दुस-या दिवसी मिळाला

कन्हान नदीत बुडालेल्या मुलाचा मुतदेह दुस-या दिवसी मिळाला. 

#) सत्रापुरच्या करण गिरवेले यांनी वाचविले दोन मुलांचे प्राण. 

 


कन्हान : – पिवळी नदी नागपुर येथील तीन मुले कन्हान नदीत पोहताना बुडाले असता दोन मुलाना वाचविण्यात यश आले परंतु विनय कुशवाह चा मुतदेह दुस-या दिवसी ढिवर समाज सेवा संघटना च्या कार्यकर्त्यानी शोधुन पाण्या बाहेर काढला. 

       शुक्रवार (दि.३०) ला दुपारी पिवळी नदी नागपुर येथील तीन मुले कन्हान रेल्वे क्रॉसींग व चपल, बुट स्वस्त मिळतात म्हणुन दुचाकीने आले आणी खरेदी केल्यानंतर बाजुलाच कन्हान नदीत पोहण्याचा मोह न आवरल्याने तिघेही नदी पात्रात आघोळी करिता पाण्यात उतरताच खोल पाण्याचा अंदाज नसल्याने तिघेही बुडताना आरडा ओरड केल्याने बाजुलाच क्रिकेट खेळणारे मुले धावुन आले. सत्रापुर येथील करण गिरवेले यांनी पाण्यात उडी घेत आयुष आशिष मेश्राम वय १५ वर्ष, व तेजस राजेश दहिवले वय १६ वर्ष रा पिवळी नदी नागपुर यांना वाचविले. परंतु विनय मधुराप्रसाद कुशवाह खोल पाण्यात फसुन बुडल्याने तो मिळाला नाही. कन्हान पोलीसाना घटना स्थळी पोहचुन शोध घेत रात्र झाल्याने दुस-या दिवसी शनिवार (दि.३१) ढिवर समाज सेवा संघटनाचे अध्यक्ष सुतेश मारबते, रामचंद्र भोयर, सुधाकर सहारे, हेमराज मेश्राम, धनराज बावने, संजय मेश्राम, विजय गोंडाळे, राजु मारबते यांच्या मदतीने विनय कुशवाह चा मुतदेह शोधु पाण्या बाहेर काढुन उपजिल्हा रूग्णा लय कामठी येथे उत्तरीय तपासणी करूण नातेवाईका च्या स्वाधिन केला. ही कारवाई पोउपनि सुरजुसे, महाजन सह पोलीस कर्मचारी यांनी यश्वस्वि पार पाडली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

स्व. इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने कु पायल येरणे सन्मानित

Wed Nov 4 , 2020
स्व. इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने कु पायल येरणे सन्मानित #) गोल्डन केअर क्लब, बंगळूर व्दारे ऑनलाईन  पुरस्कार सोहळा सम्पन्न.  कन्हान : – पासुन पुर्वेस १२ कि मी लांब असलेल्या  बोरी (सिंगोरीृ) येथील शिवशक्ती अखाडा प्रमुख कु पायल येरणे ला कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील ” गोल्डन केअर क्लब ”  व्दारे स्व. इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने […]

You May Like

Archives

Categories

Meta