खेडी येथे वर्गणीतुन पांधन रस्त्याचे मातीकाम केले

खेडी येथे वर्गणीतुन पांधन रस्त्याचे मातीकाम केले

कन्हान : – गट ग्राम पंचायत खेडी येथील शेतक-यांना वहिवाट करण्याकरिता अडचण होत असल्याने येथील शेतक-यांने वर्गणी करून स्व खर्चाने १ कि.मी पांधन रस्त्याचे मातीकाम करून रस्ता तयार करण्यात आला. 

       बुधवार (दि.२७) मे ला खेडी येथील शेतक-यांना शेतकाम करण्यास ये-जा करिता अडचण निर्माण होत असल्याने खेडी ग्राम पंचायत अंतर्गत रंगरावजी ठाकरे यांच्या शेतीपासुन ते नंदुजी इंगळे च्या शेतीजवळुन रामटेक पांधन रस्त्याला जोडणारी १ कि मी पांदण रस्त्याचे मातीकाम ३५ हजार रू वर्गणी करून स्व खर्चाने करण्यात आले . या पांधन रस्ता कामाकरिता  रामटेक विधान सभेचे आमदार आशिष जैस्वाल, रंगरावजी ठाकरे, शंकरराव काळे, राजुजी पुंड, मनोज कडु, संजय वैद्य, दिलीप ढोले, हेमराज वैद्य, सुशिल ठाकरे, सुरेश वैद्य, नारायणजी ठाकरे, अंगद हुड,  विष्णुजी ठाकरे, गंगाधर ठाकरे, पुरुषोत्तम हुड आदीने आपल्या ईच्छेने शक्तीनिशी वर्गणी करून पांधन रस्त्याचे मातीकाम करून चांगला रस्ता तयार करून मौलाचे योगदान केल्याबद्दल ग्रामस्थ शेतक-यांनी अभिनंदन करून कौतुक करित आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कांद्री च्या वेकोली कर्मचाऱ्यांने केली 'ब्लॅक फंगस वर मात

Sun May 30 , 2021
कांद्री च्या वेकोली कर्मचाऱ्यांने केली ‘ब्लॅक फंगस वर मात वेळीच उपचार केल्याने आजार नाहीसा   थोडी लक्षणं आढळल्यास लगेच तपासणी करा   कन्हान : – कोरोनाच्या वाढत्या संकटात ‘ब्लॅक फंगस’ (काळी बुरशी) आजार डोके दुःखी ठरत आहे. मात्र कांद्री च्या वेकोली कर्मचाऱ्यांने प्रचंड इच्छाशक्ती च्या जोरावर या आजारावर मात केली. त्यांना डॉक्टराचे वेळीच उपचार […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta