*घाटंजी येथे सेवाध्वज स्थापना व पुतळा अनावरण पूर्व तयारी सभा संपन्न.
—————————————
*सेवादास महाराज विज्ञान योगी पुरुष -ना.संजय राठोड
*समन्वय समिति व राष्ट्रीय बंजारा टायगर्स यांचे नियोजन
घाटंजी – संपूर्ण देशातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी व उमरी गड येथे येत्या १२ फेब्रुवारीला सेवाध्वज स्थापना व सेवादास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होत असल्याने या कार्यक्रमास समाज बांधवानी उपस्थित रहावे यासाठी घाटंजी येथील स्थानिक संत जलाराम मंदिरात पूर्व तयारी सभा पार पडली.यात हा धार्मिक सोहळा नसून बंजारा समाजाची एकजूटता व न्याय हक्कासाठी माझी लढाई असल्याचे प्रतिपादन ना.संजय राठोड यांनी केले.

येत्या १२ फेब्रुवारीला बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांच्या भव्यदिव्य पुतळ्याचे अनावरण व देशभरातील मोठ्या ध्वजाची स्थापना राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे सह राज्याच्या मंत्र्याच्या उपस्थित होत असून या कार्यक्रमाला समाज बांधवानी उपस्थित रहावे यासाठी घाटंजी येथिल स्थानिक जलाराम मंदिरात पूर्व तयारी म्हणून एका सभेचे आयोजन केले होते. या सभेत ना.संजय भाऊ राठोड उपस्थित राहून हे कार्य धार्मिक नसून वसंतरावं नाईक साहेबांनी जे कार्य केले त्यांचा वसा म्हणून मी मंत्री असतांना मला समाजासाठी काय करता येईल हा माझा प्रयत्न आहे.यासाठी समाज बांधवानी सुद्धा मला सहकार्य करावे व समाजाची ताकद दाखवावी.हा कार्यक्रम बंजारा समाजाच्या काशी असलेल्या ठिकाणी होत असला तरी केवळ धार्मिकतेला पकडून नसून जसे संत सेवालाल महाराज यांची विज्ञानवादी दूरदृष्टी होती त्याच प्रमाणे त्या श्रद्धा स्थानाचे विकास व बंजारा समाजाच्या २१ मागण्या माझ्या पुढे असल्याचे प्रतिपादन ना.राठोड यांनी केले.राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात तसे माझ्यावरही झाले पण समाजाचा विश्वास व आशीर्वाद यामुळे मी ठाम असल्याचे सांगून मी समाजाचा बांधील असल्याचे नमूद केले.यावेळेस सर्वपक्षीय नेते मंचावर उपस्थित होते घाटंजी तांड्याचे नायक नामदेवराव आडे, अरविंद जाधव, सुधाकर राठोड,मारोतराव पवार, मोहन जाधव,सहदेव राठोड, रामसिंग राठोड,आकाश जाधव, हरिहर लिंगनवार, विष्णु उकंडे प्रा.राजेश चव्हाण, वामनराव राठोड,कैलाश राठोड,नरेन्द्र चव्हान,काशिनाथ आडे, सुभाष राठोड, निलेश चव्हाण प्रदीप राठोड,मनोज राठोड हे मंचकावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय आडे यांनी केले सुत्रसंचालन आकाश राठोड यांनी केले तर आभार रवी आडे यांनी मानले.
Post Views: 989
Fri Feb 17 , 2023
चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते भजन गायिका अरुणा बावनकुळे यांचा सत्कार नागपूर,ता.१७ फेब्रुवारी जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील तुडका या गावी विदर्भ स्तरीय सांस्कृतिक कला महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिन अंकी संगीत नाटक “हंबरते वासराची माय” प्रसिध्द नाटकाचे सर्वांनी भरपूर कौतुक केले आणि श्रोते मंत्र मुगद्य […]