युवक काॅंग्रेस च्या निवेदनाची कांद्री सरपंचानी घेतली दखल

युवक काॅंग्रेस च्या निवेदनाची कांद्री सरपंचानी घेतली दखल


कन्हान : – कांद्री- कन्हान परिसरात गेल्या काही दिवसापासुन डेंगु व साथीच्या रोगाचे रूग्ण आढळत असल्याने युवक काॅंग्रेस च्या पदाधिका-यानी कांद्री ग्राम पंचायत सरपंच बलवंत पडोळे यांना एक निवेदन देऊ न डेंगु व साथीच्या रोगाचा प्रसार थांबविण्या करिता तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी केली असता सरपंच बलवंत पडोळे यांनी या गंभीर विषयाची तातडीने दखल घेत कांद्री परिसरात फाॅगिंग मशीने फवारणी सुरू करून अन्य साथीच्या रोगाविषयी जन जागृतीचे कार्य सुरू केले.   

      दरवर्षी ऋृतुत बदल होत पावसाळयात दुषित पाणी, हवा, अस्वच्छ वातावरण असल्यामुळे विविध घातक रोगाचा प्रसार होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असुन स्थानिक प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत असल्याने कांद्री कन्हान परिसरात डेगु व साथीच्या रोगाचे रूग्ण आढळत असल्याने प्रशासनाने फॉगींग मशीने औषधीची फवारणी करून नागरिकांत जनजागृति अभियान राबवुन तात्काळ अश्या रोगाना थांबविण्याकरिता उपाय योजना करायला पाहिजे. या स्तव कांद्री युवक काॅंग्रेस च्या पदाधिका-यानी सरपंच बलवंत पडोळे यांना एक निवेदन देऊन तात्काळ डेगु व साथीच्या रोगावर आळा घालण्याकरिता उपाययोज ना करण्याची मागणी केली असता सरपंच बलवंत पडोळे यांनी या गंभीर विषयाची तातडीने दखल घेत ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना  कांद्री परिसरात फाॅगिंग मशीनने औषधी फवारणी सुरू करून अन्य साथीच्या रोगाविषयी जनजागृतीचे कार्य सुरू केले. यामुळे नाग रिकांना थोडी राहत मिळाल्याने नागरिकांनी कांद्री ग्रा म पंचायत सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच श्याम कुमार बर्वे, धनराज कारेमोरे,  ग्राम विस्तार अधिकारी इंगळे, ग्रा प सदस्यांचे कांद्री युवक कॉग्रेसचे पदाधिकारी राहुल टेकाम, गणेश सरोदे, निकेश मेश्राम, अभय जांबुतकर, अक्षय देशमुख, पारस मरघडे, गणेश आकरे, विकास ठाकरे आदीने आभार व्यक्त केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान नदी काठावर संजीव महालोधी चा मुतदेह गळफास घेतलेला मिळाला

Sun Aug 8 , 2021
कन्हान नदी काठावर संजीव महालोधी चा मुतदेह गळफास घेतलेला मिळाला.  कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत जुनिकामठी वरून घाटरोहणा गावाकडे  जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला कन्हान नदिचा पात्रा लगत असलेल्या झाडाला संजीव महालोधी यांचा मुतदेह गळफास घेतलेला अवस्थेत मिळुन आल्याने फिर्यादीं मुलाच्या तोंडी बयाणा वरून कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू […]

You May Like

Archives

Categories

Meta