धर्मराज विद्यालयातील खेळाडुंची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड

धर्मराज विद्यालयातील खेळाडुंची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड

कन्हान,ता.१९

    धर्मराज विद्यालयातील चेतन पाहुणे व तन्मय चरडे या दोन्ही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. लातुर येथे राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

   राज्य क्रीडा विभागाच्या वतीने दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी धर्मराज विद्यालय कन्हान येथिल विद्यार्थी चेतन भरत पाहुणे हा १४ वर्षे व ४१ किलो वजन गटात तसेच तन्मय शेष राव चरडे हा १७ वर्षे व ४८ किलो वजन गटात कुस्ती या क्रिडा प्रकारात सहभागी झाले. चेतन पाहुणे व तन्मय चरडे यांनी तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. सोमवारी (दि.१८) देवळी जि.वर्धा येथे संपन्न झालेल्या विभागीय स्पर्धेत तन्मय चरडे व चेतन पाहुणे यांनी प्रतिस्पर्ध्यांना धुळ चारली. दोन्ही खेळाडुंची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. विद्यार्थी खेडाळुचे मार्गदर्शक शिक्षक हरिष केवटे व अनिल मंगर यांचे आणि दोन्ही खेळाडुं चे शाळेचे संस्थापक खुशालराव पाहुणे, शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर, गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, मुख्याध्यापिका संध्या तिळगुळे, उपमुख्याध्यापक सुरेंद्र मेश्राम, प्राथमिक मुख्याध्यापक खिमेश बढिये, पर्यवेक्षक प्रकाश डुकरे, मोहन भेलकर, दिनेश ढगे, सतिश राऊत, नरेंद्र कडवे, विलास डाखोळे, संतोष गोन्नाडे, विद्या बालमवार, प्रणाली खंते, स्वाती मेहर, उदय भस्मे, विजय पारधी, हरिष पोटभरे, शिवचरण फंदे व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

" गणपती बाप्पा मोरया... मंगल मुर्ति मोरया" च्या जयघोषात बाप्पांचे आगमन  घरघुती व सार्वजनिक २९ गणेश मुर्तीची स्थापना करून गणेशोत्सावाचा शुभारंभ

Wed Sep 20 , 2023
” गणपती बाप्पा मोरया… मंगल मुर्ति मोरया” च्या जयघोषात बाप्पांचे आगमन घरघुती व सार्वजनिक २९ गणेश मुर्तीची स्थापना करून गणेशोत्सावाचा शुभारंभ कन्हान,ता.१९    “गणपती बाप्पा मोरया..मंगल मुर्ति मोरया ” च्या जयघोषात कन्हान शहर आणि ग्रामिण भागात भक्तानी सार्वजनिक मंडळ व घरोघरी श्री गणेशाचे आगमन झाले. विधिवत पूजा अर्चना करुन गणेश […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta