हनुमान नगर कन्हान येथुन दुचाकी वाहन चोरी

हनुमान नगर कन्हान येथुन दुचाकी वाहन चोरी

#) कन्हान पो स्टे शन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. 

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान नगर कन्हान येथुन आकाश ठाकरे याच्या घरा समोर उभी ठेवलेली दुचाकी वाहन कोणीतरी अज्ञात आरोपी ने चोरून नेल्याने फिर्यादी च्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

        प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.२९) सप्टेंबर ला सायंकाळी ४:३० ते ७:४५ वाजता दरम्यान आकाश राधेश्याम ठाकरे वय २४ वर्ष राह. हनुमाननगर कन्हान यांची हिरो कंपनीची सुपर स्पेलंडर काळ्या रंगाची दुचाकी वाहन क्रं. एम एच ४० ए वाय ४३१० ज्याचा चेसीस क्रं. एमबीएलजेए०५ईएमजी९ए३२९६० इंजिन क्रं. जेए०५ईसीजी९ए३२१६० ची किंमत ४०,००० रू. ची दुचाकी वाहन घराच्या आंगनात समोर उभी करून ठेवले असता कोणतरी अज्ञात चोराने चोरून नेली आहे. अश्या फिर्यादी च्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादं संहिता १८६० कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष क विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस काॅस्टेंबल प्रविण ओमप्रकाश चव्हान हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पिपरी- कन्हान येथे जीवन रक्षक दल कार्यकारणी गठीत

Fri Oct 1 , 2021
पिपरी- कन्हान येथे जीवन रक्षक दल कार्यकारणी गठीत #) अध्यक्ष विजय केवट तर सचिवपदी महादेव केवट यांची निवड.  कन्हान : – लगतच असलेल्या पिपरी येथे भारतीय भोई विकास मंडळाचे राष्ट्रीय महासचिव दिलीप मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत (दि.२५) सप्टेंबर ला पावन हनुमान मंदिर देवस्थान परिसरातील सभागृहात जीवन रक्षक दल कार्यकारणी गठीत करण्यात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta