खंडाळा येथे गुरुपुजा व शाहीर कलाकार मेळावा 

खंडाळा येथे गुरुपुजा व शाहीर कलाकार मेळावा

कन्हान,ता. १२ जुलै

   कन्हान शहर परिसरातील खंडाळा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील (दि.‌९) जुलै रोजी गुरुपूजा व शाहीर कलाकार मेळावा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

    गुरुपुजेला कार्यक्रमाचे उद्घाटन व‌ दिप प्रज्वलन माजी आमदार राजेंद्र मुळक यांचे हस्ते करण्यात आले. युवा शाहीर सुरज नवघरे यांच्या विनंतीला मान देऊन गरजू विकलांग मुलगी मनसा मंगेश पाटील हिला या प्रसंगी व्हील चेअर देण्यात आली. यावेळी नवघरे यांनी राजेंद्र मुळक यांच्या समोर शाहीरांना मानधन समिती मध्ये योग्य आणि कलाकार व्यक्तीची निवड करण्यासाठी विनंती केल्याने त्यांनी अनुभवी आणि कलाकारांना न्याय मिळवून देईन अशांची मानधन समिती नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले.

   शाहीर ब्रम्हा नवघरे यांनी उपस्थित शाहीर कलाकारांना आणि मोठ्या संख्येने उपस्थित गांवकरी लोकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन हुकूमचंद ठाकरे, नरेश राऊत, सेवकराम नेवारे, राजू मुळंले यांनी केले.

   सुरज नवघरे युवा कलाकार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने कलाकार मेळाव्यात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

खंडाळा येथे गुरुपुजेला शाहीर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार

Fri Jul 14 , 2023
खंडाळा येथे गुरुपुजेला शाहीर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार कन्हान,ता.११ जुलै कन्हान शहर परिसरातील खंडाळा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील (दि.‌९) जुलै रोजी गुरुपूजा व शाहीर कलाकार मेळावा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. गुरुपुजा कार्यक्रमाचे उद्घाटन व‌ दिप प्रज्वलन माजी आमदार राजेंद्र मुळक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाहीर राजेंद्र […]

You May Like

Archives

Categories

Meta