लाचखोर अभियंता लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

लाचखोर अभियंता लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पंधरा दिवसांत सावनेर नगर परिषदेत दुसरी कारवाई

सावनेर : सावनेर नगरपालिकेचे प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता नितीन मदनकर रा. नागपुर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याने नगर परिषद कार्यालयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

मिळलेल्या माहितीनुसार, अभियंता नितीन मदनकर याने प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या मंजुरीसाठी  फिर्याद छिंदवाडा रोड, सावनेर यांच्याकडे चाळीस हजार रुपयांची लाच मागितली.त्यातील दहा हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला असुन उर्वरित तीस हजार रुपये 23 मार्च 2023 रोजी द्यायचे निश्चित झाले.
सदर बाब ही फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरला कळवली, त्याअंतर्गत छिंदवाडा रोड शिवाजी चौकात पैसे देण्यासाठी बोलावण्यात आले, तिथे अभियंता नितीन मदनकर व त्याचा साथीदार विकास राऊत याने तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताच दाभा धरुण बसलेल्या लाच लुचपत विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले.
काही दिवसांपूर्वी सावनेर नगरपरिषदेत अशाच प्रकारची कारवाई झाली असल्याने नगरपरिषदेत एकच खळबळ उडाली होती.सदर घटनेपासून धडा घेण्याऐवजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अभियंत्यांनी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांकडून लाच मागितली.त्या परिणामाचा आज सामना करावा लागला. आज घडलेल्या या दुसर्‍या घटनेपासून एकीकडे नगरपरिषद कार्यालयात पुढची विकेट कोणाची पडणार याची चर्चा रंगत आहे.तर दुसरीकडे भ्रष्ट अभियंत्याला अटक झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर येथे विशाल राममय जागरण एक शाम प्रभू श्री राम के नाम

Fri Mar 24 , 2023
सावनेर येथे विशाल राममय जागरण एक शाम प्रभू श्री राम के नाम सावनेर : स्थानिक बस स्थानक समोर रामनवमी निमित्त एक शाम प्रभू श्री राम के नाम या जागरणाचे आयोजन लोक शक्ती ग्रुप, शिवकृपा ग्रुप व आर्यन ग्रुप सावनेरच्या वतीने करण्यात येत आहे. मध्य प्रदेश येथील परासिया येथील श्री सिद्धेश्वरी […]

You May Like

Archives

Categories

Meta