बिकेसीपी शाळेने कोरोना कालावधीतील फी माफ करावी 

विक्रेता प्रसाधना कोरोनाव्हायरल फी फी माफ 

 

#) ग्रामोन्नती प्रतिष्ठान व्दारे शिक्षण उपसंचलक श्रीमती जामदार यांना निवेदन द्या. 


कन्हान: – विकिपीडियन कॉर्नोरोस बंदी असताना ऑनलाईन शिक्षण देत नाही तर पालिका तगादा लावू शकते फी वसुल करित आहे. सलग बंद असताना फी भरली नाही किंवा एकमेव कारणामध्ये वर्षाची व्यवस्था केली जात नाही-किंवा विक्रेता कारागृहात काम करत आहे जामदाराने दिलेली निवेदनाची केली आहे. 

         बीकेसीपी स्कुल कन्हान येथे नर्सरी ते १० पर्यंत विद्यार्थी शिकत आहे. कोरोनामुळे मार्च २०२० पासुन शाळा बंद असताना विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन आपातकाळ परिस्थितीत शाळेने कुठ लेही शिक्षण शुल्क न घेता विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण दिले पाहीजे. असे शासनाचे धोरण असताना १) बीकेसीपी शाळेने मार्च २०२० ते जुन २०२१ पर्यंत नर्सरी, १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांचा वाटसअप ब्रॉड कास्ट ग्रुप बनवुन मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या नोट चे फोटो पाठवुन ते वहीत लिहिण्यास सांगितले.विद्यार्थ्यां ना येणा-या अडचणींचा काहीच विचार केला नाही, फोन केल्यास फोन उचलला नसल्याने विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण झाले नाही. २) महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने २०२०-२०२१ सत्राकरिता २५ % कमी केलेला अभ्यासक्रम शाळेने कमी न करता संपुर्ण अभ्यास क्रमावर लिहिण्याचे काम शाळे व्दारे विद्या र्थ्याना पाठवुन दिशाभुल केली. ३) शाळेत इयत्ता १ ते ४ ला मराठी विषय सक्तीचा असुन सुध्दा शिकविला जात नाही. परंतु ५ वी च्या बढती विद्यार्थ्याचा मराठी पेपर कसा घेण्यात आला. ४) पेपर विद्यार्थ्यांना घरी सोडवुन पालकांनी शाळेत जमा करण्यास बोलावुन उत्तरपत्रिका फी भरल्याशिवाय घेणार नाही, अशी दमदाटी केली. ५) पुर्ण फी भरल्या शिवाय विद्यार्थ्याना वरच्या वर्गात बढती नाही, ऑनलाईन शिकविल्या जाणार नाही, बोनाफाईड, मार्क लिस्ट, टी सी मिळणार नाही. अश्या अनेक प्रकारे विद्यार्थी व पालकांना दम दाटी करून फी वसुलण्याचा गोरखधंदा करित आहे. ६) धर्माध नोंदणी कृत संस्थे व्दारे शाळा संचालित असताना शाळने नर्सरी ते इयत्ता ८ वी पर्यंत विद्यार्थ्या ना प्रवेश देताना प्रत्येक पालकांकडुन २ ते ७ हजार रू सुरक्षित ठेवी (सेक्युरेटी डिपाझीट) कोणत्या कायद्यांत र्गत घेत आहे. तसेच पालकांची सुरक्षित ठेवी १० ते १३ वर्षानी म्हणजे १० वी पास झाल्यावर शाळा सोड ताना व्याजासह परत न करता, फक्त मुद्दलच पावती असेल तरच परत करते, नसेल तर परत करित नाही का? ७) विद्यार्थ्याना ऑनलाईन लॉईव्ह शिक्षण न देता फक्त विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान करून पालकां ना शाळेची फी भरण्यास वारंवार तगादा लावुन सक्ती ने फी वसुल करित आहे. 

          बीकेसीपी स्कुल कन्हान ने मार्च २०२० पासुन शाळा बंद असताना विद्यार्थी शाळेत गेलेच नाही तरी शिक्षण शुल्क, लॉयबरी फी, जिमखाना, खेळ फी, परिक्षा फी, इनव्हेटरचे २०० रू सह दरवर्षी ५६० रु ऍक्टिव्हिटी फी ऑगस्ट व नोव्हेंबर या दोन महिन्यात ११२० रू घेतल्या जाते. ती यावर्षी टर्म फी च्या नावाने घेत आहे. सत्र २०२०-२०२१च्या विद्यार्थ्याना ऑनलाई न लॉईव्ह शिक्षण न देता शिक्षणाचा गोरखधंद करून  (दि.१) जुलैै २०२१ पासुन ऑनलाईन शिक्षण सुरू केले. मात्र (दि.३) ऑगस्ट २०२१ पासुन फी न भरल्या मुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लॉईव्ह शिक्षण शाळेने बंद केल्याने कोरोना काळात सर्व काम घंदे बंद असल्याने पालकांची आर्थिक परिस्थिती अंत्यत बिकट असताना मनस्ताप देत अनेक समस्या, प्रश्न निर्माण केल्याने पालक भयंकर त्रस्त होऊन असंतोष उसळत असल्या ने महोदया आपण विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवित्व्याचा जाणीव पुर्वक विचार करून समस्याचे योग्य निवारण करित शाळा प्रशासनावर कठोर कार्यवाही करून कोरोना ने शाळा बंद ते शाळा सुरू होई पर्यंत शाळेने फी माफ करावी तसेच कोरोना काळात मुत्यु पावले ल्या पालकांच्या पाल्याची पुर्णत:च फी माफ करून पालक व विद्यार्थ्यांना न्याय देऊन दिलासा द्यावा. शिक्षण उपसंचालक मा वैशाली जामदार मॅडम, सहाय क उपसंचालक मा मेढे साहेब, ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व माजी खासदार मा प्रकाश भाऊ जाधव, पालक मोतीराम राहटे, कमलेश पांजरे, राजाभाऊ रामल्लेवार, अशोक खंडाईत, प्रविण जुमळे, दिवाकर इंगोले, सुनिल सरोदे, किशोर वासाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भरदिवसा शिवनगर कन्हान ला घरासामोरून स्पेंडर दुचाकी चोरी

Sun Aug 22 , 2021
भरदिवा शिवनगर कन्हान ला हरसामोरून स्पेंडर दुचाकी चोरी कन्हान: – पोलीस स्टेशन अंतर्गत शिवनगर कन्हान गल्ली नंबर २ प्रभाग .१ इथून अज्ञात चोरांनी प्रदीप कोंगे यांच्या घरामध्ये लाल रंगाचा हिरो कंपनीचा स्पेंडर आयचा दुचाकी वाहन चोरून ने फिर्यादीची फिर्यादी केली आहे. सुरू झाले आहे.          प्राप्त माहिती […]

You May Like

Archives

Categories

Meta