विद्युत तारेच्या स्पर्शाने महावितरण कंत्राटी कामगाराचा मृत्यु

विद्युत तारेच्या स्पर्शाने महावितरण कंत्राटी कामगाराचा मृत्यु

कन्हान,ता.२३ जून

    कन्हान शहरातील खंडाळा (घटाटे ) गावाच्या हद्दीतील बसस्थानका जवळ विद्युत खांबावर वीज दुरूस्ती चे काम करत असताना महावितरण कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगार श्रावण भारसाखरे यांचा मृत्यु झाल्याने संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

      मिळालेल्या माहिती नुसार, गुरुवार (ता.२२) जुन रोजी दुपारी ३:३० ते ४ वाजता च्या दरम्यान तारसा रोड खंडाळा( घटाटे) बसस्थानका जवळ महावितरण कंपनीचे लाईनमॅन व‌ इतर कर्मचारी विद्युत दुरुस्ती चे काम करत होते. लाईनमॅन खांबावर चढून दुरुस्तीचे काम करत असल्याचे सांगितले जात आहे तर मृतक श्रावण लक्ष्मण भारसाखरे (वय ५०) रा.पिपरी, कन्हान तिथेच खाली उभे होते. एबी स्वीच उचलत असतांना श्रावण भारसाखरे अचानक खाली पडले. सहकाऱ्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र श्रावण भारसाखरे यांनी छातीत दुखत असल्याची सांगितले. सहकार्याने हात-पायांची मसाज करून कन्हान येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून उपचारासाठी कामठी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारा दरम्यान श्रावण भारसाखरे यांचा मृत्यू झाला.

     सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच सहाय्यक फौजदार सुर्यभान जळते, महेंद्र जळीतकर, सम्राट वनपर्ती यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला. पोलीसांनी प्रल्हाद बुद्धलाल ओमकार (वय ३९) रा.हनुमान नगर कन्हान यांचा तक्रारी वरून पोस्टे ला कलम १७४ जा.फौ अकस्मात मृत्युची नोंद करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात सहायक फौजदार सुर्यभान जळते हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तबलावादक छगन राजेंद्र बावनकुळे आकाशवाणीवर

Fri Jun 23 , 2023
तबलावादक छगन राजेंद्र बावनकुळे आकाशवाणीवर कन्हान,ता.२३ ,जुन   लोकशाहीर वस्ताद स्वर्गीय भीमराव बावनकुळे गुरुजी यांचे नातू बालकलाकार छगन राजेंद्र बावनकुळे यांच्या तबला वादन चे कार्यक्रम दिनांक 25 जुन 2023 रविवार ला नागपूर आकाशवाणीवरून सायंकाळी 6 वाजून 35 मिनिटाला प्रसारित होणार आहे. यावेळी संगीत विशारद गुरू नरेंद्र महल्ले सर यांनी हार्मोनियम […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta