मराठा सेवा संघ कन्हान व्दारे शिवाय जन्मोत्सव थाटात साजरा

मराठा सेवा संघ कन्हान व्दारे शिवाय जन्मोत्सव थाटात साजरा

#) शंभर शिवराय महाराजांच्या प्रतिमा वितरण.

कन्हान : – मराठा सेवा संघ कन्हान व्दारे बहुजनाचे राजे छत्रपती शिवराय महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्य जगतगुरू तुकाराम नगर व शिवाजी नगर कन्हान येथे जगतगुरू तुकाराम महाराज आणि राजे छत्रपती शिवराय महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व जिजाऊ वंदनासह ” शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात ” च्या जय घोष करित शिवराय महाराजाची फोटो, बुंदीचे वितरण करून शिवजन्मोत्स व थाटात साजरा करण्यात आला.
मराठा सेवा संघ कन्हान च्या वतीने शिवराय जयंती पुर्व संध्या शुक्रवार ला समाज बांधवाना शंभर शिवरायांच्या प्रतिमा व भगवा झेंडा वितरण करून स्वराज्य संस्थापक बहुजनाचे राजे छत्रपती शिवराय महाराज यांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारी ला संपुर्ण महाराष्ट्रात सणा सारखा घरोघरी रांगोळी, सजावट करून घरावरती भगवा झेंडा फडकवित शिवरायाना अभिवादन करित आंनदोत्सव म्हणुन शिवराय जन्मोत्सव साजरी  करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शनिवार दि.१९ फेब्रुवारी २०२२ ला सकाळी ११ वाजता जगत गुरू तुकाराम महाराज मंदिर, श्रीसंत तुकाराम नगर कन्हान येथे जगतगुरू तुकाराम महाराज व राजे छत्रपती शिवराय महाराज यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, जिजाऊ ब्रिगेड कन्हान कार्या ध्यक्षा छायाताई नाईक, नगरसेविका अनिता पाटील, ताराचंद निंबाळकर, नगरसेवक राजेंंद्र शेंदरे, जिवन मुंगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन करून जिजाऊ वंदनासह शिवजन्मोत्सवाची सुरूवात करून आपआपल्या वाहनाने तारसा रोड, आंबेडकर चौक ते शिवाजी नगर ला पोहचुन छत्रपती शिवराय पुतळयास व प्रतिमेस माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, न प उपाध्यक्ष डॅनियल शेंडे, मराठा सेवा संघाचे शांताराम जळते, मोतीराम रहाटे, चेतन वैद्य, जिजाऊ ब्रिगेड च्या रंजना इंगोले, सुनिता ईखार, अल्का कोल्हे आदीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ” तुम्हचे आम्हचे नाते काय ? जय जिजाऊ !! जय शिवराय !! चा जय घोष करून शिवराय प्रतिमा वितरण करण्यात आल्या. उपस्थित शिवप्रेमीना बुंदी चा प्रसाद वितरण करून शिवराय जन्मोत्सव आंनदाने थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी एकनाथ खर्चे सर, पटले सर, लुहुरेजी, भरत साळवे, घोडकी, दिलीप राईकवार, अजय भोस्कर, राजेश यादव, कमलसिंह यादव, ऋृषभ बावनकरआदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरि ता शांताराम जळते, मोतीराम रहाटे, वसंतराव इंगोले, राजुजी रेंघे, जिवन मुंगले, संदीप कुकडे, राजेंद्र शेंदरे, स्वप्निल मते, राकेश घोडमारे, अमोल डेंगे, राजु मसार, सुरेंद्र चौधरी, चेतन वैद्य, पवन माने, सुमित खैरकर, आंनद इंगोले, योगराज अवसरे, चेतन जयपुरकर, चिंटु वानखेडे, उत्कर्ष रहाटे, मयुर दोरसेतवार, ऋृतिक रेंघे, जिजाऊ ब्रिगेड च्या कमल गोतमारे, लता जळते, पुष्पा चिखले, मायाताई भोयर, प्रमिला मते, सुनिता ईखार, खर्चे मॅडम आदीने सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

शेताच्या झोपडयाला आग लागुन गायीचे वासरू, शेती साहीत्य जळुन राखरांगोळी

Tue Feb 22 , 2022
शेताच्या झोपडयाला आग लागुन गायीचे वासरू, शेती साहीत्य जळुन राखरांगोळी कन्हान : – वराडा येथे रात्री अवकाळी वादळ वारा, विजेच्या कडकडयाक्या त पाऊस येऊन शेतातील झोपडयावर विज पडुन आग लागुन कुटार व शेती उपयोगी साहीत्य जळुन राखरांगोळी होऊन झोपडयात बांधलेल्या गायीच्या ३ वासरा पैकी १ जळुन मुत्यु, १ जख्मी तर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta