श्री शिव महापुराण समिती व्दारे भव्य शोभायात्रा, राममय

श्री शिव महापुराण समिती व्दारे भव्य शोभायात्रा, राममय

कन्हान,ता.२३ जानेवारी

  तिळ संक्रांत चतुर्थी महोत्सवा निमित्य श्री शिव महापुराण समिती व्दारे पांधन रोड, गणेश मंदीर सामोरील प्रांगणात श्री शिव महापुराण कथा व श्री राधानाम रस प्रवाहचे भव्य शोभायात्रा व्दारे शुभारंभ करण्यात आले.

    (दि.२१) जानेवारी ते (दि.१) फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले‌ असून भाविकानी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष राजु बाबु राठी यांनी केले आहे.

     श्री शिव महापुराण समिती कन्हान व्दारे रविवार (दि.२१) जानेवारी ला सकाळी ११ वाजता मंगल कलश यात्रा श्री गणेश मंदिर सामोरिल कैलास धाम येथुन काढुन यात शेकडो डोक्यावर कलशधारी महिला, श्री राम, लक्ष्मन, सिता व श्री हनुमान यांचे सुंदर पात्र रथा मध्ये मनमोहित करित होते.

   राम सेतु, तांडव नुत्य व भगवाधारी गरबा नुत्य शो़भारात्रेचे विशेष आकर्षण होते. कन्हान शहर भगव्या ध्वजानी सुशोभित करण्यात आले.

   दर्शना करिता महामार्गाच्या दोन्ही कडे भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांनी घरासमोर रांगोळी, सजावट, पाणी पाऊच, बिस्किट, बुंदा, बासुंदी , प्रसाद वितरण आणि फुलांचा वर्षावात भव्य स्वागत केले.

    कैलासधाम ला पोहचुन शिव महापुराण महात्म्य वृदांवन (उ.प्र.) येथील ११ वर्षीय देविका दिक्षित यानी सुमधुर वाणीने सुरू करून कलश यात्रेत कलशा मध्ये सर्व देवी, देवता व नदियांचा वास असुन जोहि डोक्यावर कलश धारण करून चालतो त्यांच्या घरी, परिवारात सुख, शांती नांदत असते. श्री राम जन्मभुमि अयोध्या ला श्री राम मंदिर शुभारंभा निमित्य (दि.२२) तारखे ला प्रवचन स्थळी दिवे दान करण्याचे भाविकांना आवाहन केले.

       (दि.२१) जानेवारी ला भव्य शो़भायात्रेने श्री शिव महापुराण कथा व राधानाम रस प्रवाह चा शुभारंभ करून श्री गणेश मंदिरात संकट चतुर्थी निमित्य नुत्य व गायन स्पर्धा, १०१ किलो लाडुचा भोग आणि (दि. १) फेब्रुवारी ला विशाल भंडारा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता श्री शिव महापुराण आयोजन समिती व श्री गणेश मंदीर सेवा समिती कन्हान चे दिलीप जैस्वाल, राजु राठी, रमण गांधी, शैलेष झेंडे, अंकित यादव, सुरेश अहिरकर, संतोष पाली, प्रकाश तिवारी, अमित थटेरे, चंद्रकुमार चौकसे, सर्वेश तिवारी, अनिल चौकसे सह सर्व मान्यवर सदस्य परिश्रम करून सहकार्य करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भक्तीस्थळांवर सभामंडप, लोकार्पण सोहळा रश्मी बर्वे यांच्या हस्ते

Tue Jan 23 , 2024
भक्तीस्थळांवर सभामंडप, लोकार्पण सोहळा रश्मी बर्वे यांच्या हस्ते कन्हान,ता.२३ जानेवारी      प्रभू श्रीरामचंद्राची प्राणप्रतिष्ठा या पवित्र दिनी ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) भक्तीस्थळांवर सभामंडप, सुशोभीकरणनाच्या १९ लक्ष रुपयांचे भूमिपूजन आणि १५ लक्ष रुपयांचे सभामंडपाचा लोकार्पण सोहळा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या हस्ते पार पडला.     १७ सामूहिक […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta