धर्मराज कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० % निकाल ; कन्हान शहरातुन बारावी परिक्षेत मुलीने बाजी मारली

धर्मराज कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० % निकाल

#) कन्हान शहरातुन बारावी परिक्षेत मुलीने बाजी मारली.

कन्हान : – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाद्वारे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या १२ वी च्या मार्च २०२२ च्या निकालात धर्मराज कनिष्ठ महा विद्यालयाचा १०० %, नारायण विद्यालय १०० %, निकाल लागला असुन याहीवर्षी कन्हान शहरातुन मुलीनी मुलाच्या तुलनेत निकालात बाजी मारली आहे .
बारावी परीक्षा ४ मार्च ते ३१ मार्च दरम्यान होम सेंटरवर घेण्यात आली होती. मार्च २०२२ च्या घोषित निकालात धर्मराज कनिष्ठ महाविद्यालय कांद्री-कन्हान चे विज्ञान शाखेत ८३ विद्यार्थी परिक्षेत बसले असुन ८३ विद्यार्थी पास होऊन विद्यालयाचा १०० % निकाल लागला. यात कु जानवी सेवकराम भोंडे ९०.३३ % गुण प्राप्त करून विद्यालयातुन प्रथम तर कु सानिका अनिल मंगर हीने ८८ % गुण प्राप्त करून दुस-या क्रमाक पटकाविला आहे. नारायण विद्यालय कन्हान येथील विज्ञान व वाणिज्य शाखेचा १०० % निकाल. यात विज्ञान शाखेत कु खु़शी सुनिल मेश्राम ८४.८३ % आणि वाणिज्य शाखेत देवांश महेश दिक्षीत ८३.०० % गुण प्राप्त करून विद्यालयातुन प्रथम आले आहे.
भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान येथील कला शाखेत बसलेलं १४४ पैकी १२७ विद्यार्थी उतिर्ण विद्यालयाचा निकाल ९०.०७ % तर वाणिज्य शाखेतुन ७१ पैकी ७१ उत्तीर्ण होऊन १००% निकाल लागला आहे. कला शाखेतुन कु.पलक सोमनाथ मरस्कोल्हे हिने ६०० पैकी ४६१ गुण मिळवुन ७६.८८ % ने उत्तिर्ण होऊन प्रथम, कृ नेहा ज्ञानेश्वर पटले हिने ६०० पैकी ४२३ गुण मिळवुन ७०.०५ % मिळवुन व्दितीय तर कु अंकली रविराम कुळसते हिने ६०० पैकी ४०६ गुण ६७.६६ % मिळवुन तृतिय क्रमाक पटकविला आहे. आणि वाणिज्य शाखेत प्रथम कु आकांशा हरिचंद्र चकोले ने ६०० पैकी ४७० म्हणजे ७८.३३ %,व्दितीय, कु धनेश्वनी विजाऊ बघेल ६०० पैकी ४५४ गुण प्राप्त करून ७६.१६ % तर तृतीय अनिकेत सुर्यभान येळणे याने ६०० पैकी ४५१ गुण प्राप्त करित ७५.१६ % मिळुन उत्तीर्ण झाला आहे. यामुळे याही वर्षी मुलीने बाजी मारली आहे.

फोटो –
१) कु जानवी सेवकराम भोंडे
२) कु सानिका अनिल मंगर
३) कु नेहा ज्ञानेश्वर पटले
४) कु धनेश्वनी विजाऊ बघेल
५) अनिकेत सुर्यभान येळणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान व कांद्री येथे वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरी*

Tue Jun 21 , 2022
*कन्हान व कांद्री येथे वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरी*     कन्हान – कन्हान व कांद्री परिसरात वट पौर्णिमा निमित्य विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करुन वटवृक्षाची विधिवत पुर्जा अर्चना करुन मंगळवार (ता१४) जून 2022 रोजी पहाटे पासुन तर सायंकाळपर्यंत वट पौर्णिमा साजरी करण्यात आली .   हिंदू पंचांगानुसार , ज्येष्ठ […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta