३ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावळी शिवारात गावठी दारूभट्टी वर कारवाई

*पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावळी शिवारात सुरू असलेल्या गावठी दारूभट्टी गुन्हे शाखे ग्रामिण नी उध्वस्त केली*. *अवैधरित्या दारू वाहतूक करणारे*
*अटक,एकूण ३ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला*

कमलसिह यादव
पारशीवनी तालुका प्रातिनिधी

*पारशिवनी*(ता प्र):-पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावळी शिवारात सुरू असलेल्या गावठी दारू भट्टीची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा, नागपूरच्या पथकाने शनिवारी (१७ एप्रिल) धडक कारवाई करून गावठी दारूभट्टी उध्वस्त केली. तसेच अवैधरित्या दारू वाहतूक करणार्‍यावर धडक कारवाई करून एकूण ३लाख ९ हजार ४00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली.
कोरोनाच्या वाढता उद्रेकामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरिता नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पथक नियमीतपणे विविध ठिकाणी गस्त करीत आहेत. शनिवारी रात्री एक पथक रामटेक उपविभागात गस्त करीत असताना पथकाला गुप्त माहिती मिळाली की, पोलिस स्टेशन पारशिवनी हद्दीतील सावळी शिवारात एका नाल्याच्या बाजुला सर्रासपणे गावठी दारू गाळण्याचे कार्य सुरू आहे.
माहितीवरून सदर ठिकाणी धाड टाकली असता(१) एकनाथ संतोष भलावी (वय ४२), (२)मुरलीधर गोविंदा शेन्द्रे (वय ४४), (३)अमोल ईश्‍वर मसस्कोल्हे (वय २३) सर्व रा. बनेरा, ता. पारशिवनी, जि. नागपूर हे लोक मोठय़ा प्रमाणावर भट्टी लाऊन अवैधरित्या मोहाफुलाची गावठी दारू गाळण्याचे कार्य करीत असताना मिळून आले. यावेळी २७0 लीटर मोहाफुल तयार दारू किं. ४0,५00 रुपये, मोहाफुल सडवा २४00 लिटर एकूण २ लाख ४0 हजार रुपये, दारू गाळण्याचे २५ हजार ५00 रुपयांचे साहित्य, असा एकूण ३ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दारू व मोहाफुल सडवा मोक्यावर नाश करण्यात आला. आरोपीविरुद्ध पारशिवनी ठाण्यात येथे गुन्हा नोंद करून आरोपीला पुढील कार्यवाहीकरिता ताब्यात घेण्यात आले.


सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार, पोलिस उप निरी. सचिन मत्ते, पोहवा ज्ञानेश्‍वर राऊत, महेश जाधव, पो. ना. दिनेश आधापुरे, राजेश रेवतकर, पो. शि. वीरेंद्र नरड, अमोल वाघ, विपीन गायधने, चासफौ साहेबराव बहाले, चपोना अमोल कुथे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

11 गोवंशला जीवनदान व 7,65,000/- रूपयाचा मुद्देमालसह जप्त : कन्हान पोलिसांची कारवाई

Tue Apr 20 , 2021
11 गोवंशला जीवनदान व 7,65,000/- रूपयाचा मुद्देमालसह जप्त कन्हान ता.18 : पोलिस स्टेशन कन्हान परीसरातील सींगोरी बोरी तारसा फाट्यावर ( दि.18) रविवार रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान गुप्त माहीतीवरून नाकाबंदी करून 11 गोवंशला जीवनदान देऊन व एकूण 7,65,000/- रूपयाचा मुद्देमालसह जप्त करण्यात आला. संजय बरोदीया यांचा माहीतीनुसार कन्हान शहरात अंतर्गत […]

You May Like

Archives

Categories

Meta