३६ जुगाऱ्यांना अटक ; वाढती गर्दी आणि रोशनाईमुळे पोलिसांना आला संशय

३६ जुगाऱ्यांना अटक ; वाढती गर्दी आणि रोशनाईमुळे पोलिसांना आला संशय

अमरावती रोडवरील कोंढाळीजवळ ईगल इन रिसॉर्ट ‘ नावाने पॉश रिसॉर्ट आहे . गेल्या काही दिवसांपासून या रिसॉर्ट्सवर अचानक गर्दी वाढायला लागली होती . तसेच रिसॉर्ट मालकानेही मोठी रोषणाई लावून सजविले होते .

नागपूर : कोंढाळीतील ‘ ईगल इन रिसॉर्ट’मध्ये सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर नागपूर ग्रामीण पोलिसांनी छापा घातला . या छाप्यात तब्बल ३६ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली . आरोपींकडून ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . ही कारवाई बुधवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अमरावती रोडवरील कोंढाळीजवळ ‘ ईगल इन रिसॉर्ट ‘ नावाने पॉश रिसॉर्ट आहे . गेल्या काही दिवसांपासून या रिसॉर्ट्सवर अचानक गर्दी वाढायला लागली होती . तसेच रिसॉर्ट मालकानेही मोठी रोषणाई लावून सजविले होते . रात्री – बेरात्री या रिसॉर्टवर होणारी गर्दी पाहता स्थानिक गुन्हे शाखेला संशय आला . त्यामुळे या रिसॉर्टमध्ये होणाऱ्या हालचालींवर पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक सचिन मत्ते यांनी बारीक लक्ष ठेवले . गेल्या तीन दिवसांपासून अनेक कार नियमितरीत्या येत असल्याचे आढळले . त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास रिसॉर्टवर छापा घातला . या छाप्यात ३६ आरोपी जुगार खेळताना आढळून आले . पोलिसांना बघून आरोपींनी पळापळ केली . पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली . त्यांच्याकडून १४ महागडे फोन , ८ कार आणि अडीच लाख रुपये नगदी असा ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती : खापा

Thu Oct 15 , 2020
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती : खापा खापा : १५ ऑक्टोंबर  जिजामाता हायस्कूल व कनिष्ठ कला – वाणिज्य महाविद्यालय, खापा येथे भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न, मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त शिवश्री पवन लांबट सावनेर तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्या निमित्य कार्यक्रमात     मुकेश […]

You May Like

Archives

Categories

Meta