बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी

*बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी*

जाहिराती करिता संपर्क 7020602961

कन्हान – आदिवासी सेवा संघ कन्हान शहर द्वारे क्रांतीवीर महामानव बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .


सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर ला क्रांतीवीर महामानव बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या जयंती निमित्य आदिवासी सेवा संघ कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेविका राखी परते , उद्घाटक गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष सुखलाल मडावी यांच्या हस्ते क्रांतीवीर महामानव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला व डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असता कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित असणारे मुलनिवासी गोंडीयन समूहाने क्रांतीविर बिरसा मुंडा अमर रहे च्या जयघोष करुन परिसर क्रांतीमय केला असुन कार्यक्रमाचे उदघाटक सुखलाल जी मडावी यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या केलेल्या क्रांतीची व इतीहासाची माहिती अवघत करून उपस्थित जन समूहात होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरूध्द लोकशाही मार्गाने लढा ऊभरावा असे स्पष्ट करून गोंडवाना समाजातील एकतेचे महत्व पटवून दिले त्यानंतर माजी नगरसेविका राखीताई संदीप परते यांनी आपले मनोगत व्यक्त करुन व परिसरातील नागरिकांना बुंदी वितरण करुन बिरसा मुंडा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी महाराष्ट्र गोंडवाना गणतंत्र पार्टी उपाध्यक्ष सुखलाल मंडावी , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , राजेश यादव , मनिष भिवगडे , कांन्द्री ग्रामपंचायत सदस्य राहुल टेकाम , राजेश फुलझेले , पंचमजी सलामे , खुशाल बन्सोड , रंजनिश ऊर्फ बाळा मेश्राम , संदीप परते , संजय रंगारी, गगन सिरसाम , बंडूजी ईरपाते , खैलेश सलामे , रवी पंधरे , सुनील टेकाम , जे डी भलावी , राजवीर मडावी , अनिल मरस्कोले , शंकर मडावी , सोनु मडावी , राजेश टेकाम, रुषभ बावनकर , सुरज वरखडे रुपलताबाई सलामे, रेखाबाई परतें, मालतीबाई भलावी , सुशिला ईनवाते , केशरबाई सिरसाम, सुभांगी मडावी ,पलक मडावी , खुशी जामकर सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन गोंडवाना गणतंत्र पार्टी कन्हान शहर अध्यक्ष सोनु मसराम यांनी केले तर आभार संदीप परते यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर तर्फे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी

Wed Nov 17 , 2021
*वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर*   वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गहुहिवरा चौक आनंद नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित चेतन वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला व मनीष नंदेश्वर यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा प्रतिमेला पुष्प हार […]

You May Like

Archives

Categories

Meta