दखणे हायस्कूलच्या शालेय खो-खो स्पर्धेत दबदबा कायम

 

  • दखणे हायस्कूलच्या शालेय खो-खो स्पर्धेत दबदबा कायम

कन्हान,ता.१८ नोव्हेंबर

    महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागाच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद च्या वतीने सन 2022-2023 या सत्रातील शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा तालुका पारशिवनी मधील हरिहर विद्यालय पारशिवनी येथे सुरू असलेल्या शालेय खो-खो स्पर्धेत बळीरामजी दखणे हायस्कूल कन्हान चे विद्यार्थी अंडर 17 मुले गटात केसरीमल हायस्कूल व लालबहादूर शास्त्री विद्यालय ला पछाडनी देत नेहमीप्रमाणे आपला दबदबा कायम ठेवला. तसेच अंडर- 14 मुले गटात अंतिम सामन्यात हरिअर विद्यालया ला पटखनि देत तिथेही बळीरामजी दखणे हायस्कूल ने आपले वर्चस्व नेहमीप्रमाणे कायम ठेवले. तसेच अंदर 17 मुली गटातही दखणे हायस्कूलच्या मुलींनी बाजी मारून काटोल येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत आपली हजेरी लावणार. त्याचबरोबर शालेय कुस्ती स्पर्धेत बळीराम दखणे हायस्कूलची अंडर 14 मुली गटात प्रियंका कोठेकर ने बाजी मारून नागपूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती सामन्यात आपली हजेरी लावणार. बळीराम जी दखणे हायस्कूल च्या प्राचार्या सौ.विशाखा ठमके मॅडम ने सर्व विजयी खेळाडूचे कौतुक केलेे. जिल्हास्तरीय स्पर्धे करिता खेळाडूंना व शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.माधव केवलरामजी काठोके सर यांना शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानले. तसेच स्पर्धेला उपस्थित असलेले शिक्षक श्री.विलास सर अमित थटेरे सर, श्री.गवळी सर, सौ.मोटघरे मॅडम, सौ. कोहळे मॅडम, श्री.गणवीर, श्री.अनिकेत वैद्य्य, श्री निखिल यांना शुभेच्छा दिल्या व सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान (पिपरी) शेतशिवारात बिबट्याचा मृत्यू 

Wed Nov 23 , 2022
कन्हान (पिपरी) शेतशिवारात बिबट्याचा मृत्यू वनविभागाने मौका चौकसी व पंचनामा करून शव उत्तरीय तपासणी कन्हान,ता.२३ नोव्हेंबर  पारशिवनी तालुक्यातील कन्हान-पिपरी, गाडेघाट जुनीकामठी रोड वर दामु केवट व परमानंद शेंडे यांच्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढल्याने एकच खळखळ उडुन घटनास्थळी रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत आणि वन विभागाच्या पथका ने तात्काळ घटनास्थळी […]

You May Like

Archives

Categories

Meta