निराधार महिलांना राजेंद्र मुळक व्दारे शिलाई मशीन वाटप

निराधार महिलांना राजेंद्र मुळक व्दारे शिलाई मशीन वाटप

नांदगाव च्या मुले व युवकाकरिता पावर जिम साहित्य वाटप

कन्हान, ता.28 ऑगस्ट

  कोराना काळात निराधार झालेल्या ग्रा.प. नांदगाव येथील दोन महिलांना स्वावलंबी करण्याकरिता मा. राजेंद्रजी मुळक यांनी सामाजिक बांधिलकी जपत भाऊ साहेब मुळक प्रतिष्ठाण च्या उपक्रमांतर्गत शिवणयंत्र (शिलाई मशीन) भेट देत गावातील मुले, युवकांच्या विकासाच्या दुष्टीने पावर जिम चे साहित्य वाटप करण्यात आले.
गुरूवार (दि.४) ऑगस्ट ला ग्राम.पंचायत नांदगाव येथे माजी मंत्री तथा नागपुर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.राजेंद्र मुळक यांच्या सामाजिक बांधिलकी जपत भाऊ साहेब मुळक प्रतिष्ठाण च्या उपक्रमांतर्गत कोरोना काळात कुंटुबांचा कर्ता पती दिवंगत झाल्याने निराधार झालेल्या शारदा संजय धुवेॅ व प्रिया नंदकिशोर काळसर्पे या दोन महिलांना परिवाराच्या पालन पोषणाकरिता स्वयंरोजगार करून स्वावलंबी व सक्षम बनविण्याकरिता जि.प.सदस्या अर्चना ताई भोयर, पं.स. सदस्या मंगलाताई निंबोणे, पारशिवनी उपसभापती चेतन देशमुख यांच्या हस्ते शारदा धुर्वे व प्रिया काळसर्पे या दोन महिला लाभार्थींना शिवण यंत्र (सिलाई मशिन) चे वाटप करण्यात आले. तसेच नांदगावातील मुले व युवकांना शरीरयष्टी बनविण्यास व्यायाम करण्याकरिता पावर जिम चे साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी दिपकजी भोयर, देवरावजी ठाकरे, रामभाऊ ठाकरे, डुमनजी चाकोले, धीरज भोत मांगे, चेतन ठाकरे, अशोक रच्छोरे‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌, तुषार ठाकरे, राज ठाकरे, विक्की ठाकरे सह कॉग्रेस पदाधिकारी, कार्यक र्ते, ग्रामस्थ व महिला मंडळाच्या महिला आवर्जुन उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

"आझादी का अमृत महोत्सव " हर घर तिरंगा कार्यक्रम

Sat Aug 6 , 2022
  “आझादी का अमृत महोत्सव ” हर घर तिरंगा कार्यक्रम नेहरू युवा केंद्र व समता सांस्कृतिक, शैक्षणिक बहुउद्देश्यीय संस्था द्वारे पुढाकार. कन्हान,ता.06 ऑगस्ट     नेहरू युवा केंद्र नागपुर, युवा व खेळ मंत्रालय भारत सरकार आणि समता संस्कृतीक, शैक्षणिक बहुउद्देश्यीय संस्था, कन्हान व्दारे पारशिवनी तालुक्या तील कन्हान शहरातुन ७५ वर्ष […]

You May Like

Archives

Categories

Meta