भारतीय जनता पार्टी पक्षाचा दिला शंकर चहांदे यांनी राजीनामा रामटेक लोकसभा आरक्षित जागा लढवण्यास इच्छुक 

भारतीय जनता पार्टी पक्षाचा दिला शंकर चहांदे यांनी राजीनामा

रामटेक लोकसभा आरक्षित जागा लढवण्यास इच्छुक 

कन्हान,ता.२३ मार्च 

  रामटेक लोकसभा अनुसूचित जाती करिता आरक्षित असतांना पक्षाने शंकर चंहादे यांच्या नावाचा विचार करणे भारतीय जनता पार्टी ला अभिप्रेत होते. परंतु जुन्या आणि एकनिष्ठ सदस्य नावाचा विचार करण्यात येत नसल्याने शंकर चंहादे यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाचा प्राथमिक सदस्य व सर्किय पक्षाचा राजीनामा दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

 शंकर चिंतामन चहांदे रा.कन्हान तालुका पारशिवनी, जिल्हा नागपुर सन १९९२ पासुन भारतीय जनता पार्टी पक्षा मध्ये कार्यरत आहे. ज्यावेळी अनुसूचित जाती कडुन कोणीही व्यक्ति निवडणुक लढण्यास तयार नव्हते तेव्हा सन १९९२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणुक लढविण्यात आली. तेव्हा पासुन आजतागायत भारतीय जनता पार्टी ने वेळोवेळी जी जी पक्ष हितार्थ आणि आदेशान्वये जबाबदारी दिली ती पक्षाशी एकनिष्ट राहुन प्रामाणिक पणे कोणताही स्वार्थ न ठेवता पार पाडली.

     शंकर चंहादे यांनी भुषवलेली पदे १९९२ मध्ये जि.प.सदस्य पदाची निवडणुक लढविली. १९९४- २००७ अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष नागपुर जिल्हा, १९९७ – २००२ सदस्य जि प नागपुर, १९९८-९९ समाज कल्याण सभापती जि.प नागपुर २००२ – २००७ सदस्य जि प नागपुर, २००७ -२०१३ भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय परिषद सदस्य, २०१५ – २०२० सदस्य नगरपरिषद कन्हान-पिपरी, २०१७- २०२० नगराध्यक्ष नगरपरिषद कन्हान-पिपरी, २०२० ते आज पर्यंत नामर्निदेशीत सदस्य नगर परिषद कन्हान या मागील ३२ वर्षा पासुन भारतीय जनता पक्षा मध्ये कार्यरत असतांना प्रमुख पदाकरिता शंकर चंहादे यांच्या नावाचा पक्षाने विचार करायला पाहीजे होता. त्या त्या वेळी पक्षाने डावलण्यात आले असुन माझ्यावर अन्याय झालेला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

    तसेच रामटेक लोकसभा अनुसूचित जाती करिता आरक्षित असतांना पक्षाने नावाचा विचार करणे अभिप्रेत होते. परंतु माझ्या नावाचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य व सर्किय पक्षाचा राजीनामा भाजपा नागपुर जिल्हाध्यक्ष मा.सुधाकर कोहळे यांचे कडे पाठविलेला आहे असे यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान येथून शिर्डी करिता पालखी पदयात्रेचे जल्लोषात प्रस्थान श्री साईराम पालखी सोहळा समिती व्दारे १४ व्या वर्षी आयोजन

Wed Mar 27 , 2024
कन्हान येथून शिर्डी करिता पालखी पदयात्रेचे जल्लोषात प्रस्थान श्री साईराम पालखी सोहळा समिती व्दारे १४ व्या वर्षी आयोजन  कन्हान, ता. २७ मार्च     श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान जि.नागपुर व्दारे १४ व्या वर्षी बुधवार (दि.२७) साई पालखीचे आयोजन करण्यात आले. ही पालखी सोहळा श्री साई मंदीर इंदिरा नगर, कन्हान […]

You May Like

Archives

Categories

Meta