१९ फेब्रुवारी ला राजे शिवराय जयंती महोत्सव

१९ फेब्रुवारी ला राजे शिवराय जयंती महोत्सव

कन्हान,ता.१७ फेब्रुवारी

    मराठा सेवा संघ कन्हान व्दारे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य क्रिडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करून राजे शिवराय जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

      राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव रविवार (दि.१९) फेब्रुवारी २०२३ ला मराठा सेवा संघ कन्हान व्दारे सकाळी ७.३० वाजता संत तुकाराम महाराज मंदीर, तुकाराम नगर कन्हान येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात येईल. शिव मिरवणुक तुकाराम नगर, शहीद चौक, तारसा रोड चौक, आंबेडकर चौक ते शिवाजी नगर कन्हान येथे पोहचुन सकाळी ८.३० वाजता शिवाजी महाराज स्मारक शिवाजी नगर कन्हान येथे शिवाजी महाराजांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करेल.

    क्रिडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा व इतर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या मान्यवरांचा सत्कार सोहळ्याने राजे छत्रपती शिवराय जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमास बहु संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठा सेवा संघ शाखा कन्हान व्दारे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे यांची पुण्यतिथी कार्यक्रम

Fri Feb 17 , 2023
क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे यांची पुण्यतिथी कार्यक्रम कन्हान, ता.१७ फेब्रुवारी   थोरपुरुष विचारमंच मित्र परिवार, टेकाडी यांच्या तर्फे क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम गुरुकृपा मर्दानी आखाडा, टेकाडी (रामसरोवर) येथे पार पडला.      सर्व प्रथम लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला सरपंच विनोद इनवाते यांच्या हस्ते माल्यर्पन करण्यात आले. […]

You May Like

Archives

Categories

Meta