कन्हान मध्ये पत्रकारांच्या घरावर गुंडांचा प्राणघातक हमला

कन्हान मध्ये पत्रकारांच्या घरावर गुंडांचा प्राणघातक हमला.

#) एक आरोपी पोलीसाच्या ताब्यातुन पसार. 


कन्हान : – येथील ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश गोडघाटे यांच्या घरावर गावगुंडांनी अश्लिल शिवीगळ करित दरवाज्यावर लाथ, दगड व शस्त्राने मारून जिवे मारण्याचा प्राणघातक हमला केला. अंगणात असलेल्या वॅगनर कार चे काच फोडले. 

        सोमवार (दि.२१) ला सकाळी ९ वाजता दरम्यान पत्रकार रमेश गोडघाटे हे आपल्या कुटुंबासह संताजी नगरातील आपल्या घरी असताना आरोपी बंटी शर्मा व दिपक गडे हे दोघे पत्रकार गोडघाटे यांच्या घरासमोर येऊन अश्लील भाषेत शिविगाळ करित होते. अचानक होत असलेल्या प्रकाराबद्दल पत्रकारा सह कुटुंबीय भयभीत झाले व आतुन दरवाजा बंद  करून घेतला. तेव्हा बाहर निकल तुझे जानसे मारुंगा . म्हणत लाकडी दरवाज्यावर लाता, दगड व शस्त्राने मारून मेरी थाने मे शिकायत क्यो किया. मेरे धंदे के बारे मे पेपर मे न्युज क्यो छपाया म्हणत सदर गुंडांनी अंगणात उभी असलेल्या वेगनआर चारचाकी गाडी – एम एच क्र.- ३२८८ ची काच फोडली. व निघुन गेले. परत दहा मिनिटाने पुन्हा दोघेही आरोपी घटना स्थळी दुचाकीने आले असता त्यांना पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. पण त्यातील बंटी शर्मा हा कन्हान पोलीसांच्या हातात तुरी देत तावडीतून सुटून फरार झाला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर दिपक गडे याला अटक केली.

कन्हान पोलीसांनी नगरातील नागरिकांच्या व फिर्यादी यांचे तक्रारीवरून दोन्ही आरोपी विरूध्द कलम २९४, ५०४, ५०६, ४२७, ३४  भादंवि नुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पारशिवनी येथिल ताकिया मोराती मंदिर सभागृहात ७वॉ आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Mon Jun 21 , 2021
*पारशिवनी येथिल ताकिया मोराती मंदिर सभागृहात ७वॉ आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*. *पाराशिवनी*(ता प्र):-पारशिवनी नगर पंचायत व पताजलीं योग प्रचारक सामिती यांचे संयुक्त विद्यामाने तकिया मारोती देवस्थान सभागृहात येथे ७वा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नगर पंचायत पारशिवनी व पताजलीं योग प्रचारक समिती च्या संयुक्त वतीने योग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमात पताजली […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta