मनोजसिंह चौहान यांच्या रेल्वे अपघातात मुत्यु

कन्हान,ता.२५ एप्रिल
बळीराम दखने हायस्कुल चे शिक्षक मनोजसिंह चौहान यांचा तारसा रोड रेल्वे क्रॉसिंग च्या जवळ नागपुर वरून भंडारा कडे जाणा-या रेल्वे माल गाडीने अपघात होऊन त्यांचा घटनास्थळीच मुत्यु झाला.
प्राप्त माहीती नुसार, सोमवार (दि.२४) एप्रिल ला रात्री ९ ते १०.३० वाजता दरम्यान बळीराम हॉयस्कुल कन्हान येथील सहाय्यक शिक्षक मनोजसिंह धीरसिंह चौहान (वय.५४) राह. राधाकृष्ण नगर, कन्हान रात्री तारसा रोड कडे फिरायला गेले. तारसा रोड रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ नागपुर वरून भंडारा कडे जाणा-या रेल्वे मालगाडी ने अपघात होऊन त्याचा घटनास्थळीच मुत्यु झाला. त्याच्या मृतदेहाचे कामठी उपजिल्हा शासकिय रूग्णालयात शवविच्छेदन करून कामठी पोलीसांनी त्यांच्या नातेवाईकाना मृतदेह सुपुर्द केला. त्याचे राहते घर राधाकृष्ण नगर, कन्हान येथुन मंगळवार (दि.२५) एप्रिल ला दुपारी २.३० वाजता अंतिम यात्रा काढुन कन्हान नदी शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला. त्यांचा मागे पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार सोडुन गेले.
Post Views: 676
Wed Apr 26 , 2023
श्मशान घाट प्रस्तावित नसतांना नगरपरिषद ला बदनाम करण्याचं काम – नगराध्यक्ष कन्हान,ता.२५ एप्रिल नागपुर जिल्हयाची जिवनदायणी कन्हान नदी किना-या लगत बीकेसीपी शाळेचा मागे नगर परिषद कन्हान-पिपरी व्दारे शमशान घाट बनविण्याचे प्रस्तावित केले. घाटावर मुतदेहाचा अंतिम संस्कार करताना धुर व दुर्गंधी मुळे शाळेच्या विद्यार्थ्या च्या शिक्षणावर व आरोग्यावर […]