कल्पेश तरूणाच्या हत्येमुळे कन्हान शहर हादरलं एकाला संपवल तर पळ काढल्याने दोघांचे प्राण वाचले

कल्पेश तरूणाच्या हत्येमुळे कन्हान शहर हादरलं
एकाला संपवल तर पळ काढल्याने दोघांचे प्राण वाचले

कन्हान,ता.10 सप्टेंबर

गणपती विसर्जनाला कन्हान शहरात कडक पोलीस बंदोबस्त असताना बोर्डा रोड वरील भारत पेट्रोलपंप समोर कल्पेश बावनकुळे डी.जे.व्यवसायकांचा दोन अज्ञात युवकांनी दुचाकी थांबवुन रात्रीचा सुमारास धारदार शस्त्राने सपासप वार करुन एकाची निर्घुणपणे हत्या केली. तर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढल्यामुळे त्यांचा थोडक्यात जीव वाचला. ही घटना समोर आल्याने कन्हान शहरात भीतीचे वातावरण पसरलं आहे.

पोलिसांकडून  मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (ता. ११) सप्टेंबर ला रात्रीच्या सुमारास १२:०० ते १:०० वा. च्या दरम्यान मृतक कल्पेश भगवान बावनकुळे (२८)  रा.बनपुरी आपल्या दुचाकी क्र.एम.एच.४९ बीएल ५६२८ वाहनाने नागपुर वरुन डी.जे .चा आॅर्डर पुर्ण करुन मित्र सुरज ढोबळे व जीतेंद्र ढोबळे यांचा सोबत बोर्डा रोड ने बनपुरी गावाकडे जात होता. भारत पेट्रोलपंप समोर दोन अज्ञात युवकांनी आडवे आल्याने कल्पेश बावनकुळे यांने गाडी थांबवली. मृतक व त्याचे मित्र खाली पडल्याने युवकांनी काही न विचारता थेट हल्ला चढवला. कल्पेश बावनकुळे व त्याचे मित्र  अॅक्टीवा वाहन सोडून पेट्रोल पंपच्या दिशेने पळाले. युवकांनी कल्पेश बावनकुळे याला पकडून त्याचा शरीरावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन हत्या केली. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक विलास काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम, नरेश वरखडे, कोमल खैरे, जितु गावंडे आदि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय पाठवले. उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करुन आरोपीविरुध्द पथक तयार करुन शोध सुरु केला आहे .

 

डिजे व्यवसायाच्या वादावरून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज – ठाणेदार विलास काळे

रविवार रात्री १२.३० वाजता बोरडा रोडवर डीजे मालक कल्पेश बावनकुळे ची अज्ञात आरोपींंने  निर्दयतेने हत्या केल्याने ही हत्या डिजे व्यवसायातुन केली असल्याचा प्राथमिक अंदाज वरून कन्हान पोलीसांचे दोन पथक व स्थागुअ शाखा नागपुर ग्रामिण चे पथक हत्येच्या आरोपींताचा शोध करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भुमिपुत्र संघटना व्दारे स्वयं सेवेतुन विर्सजन घाटाची स्वच्छता ढिवर समाज संघटना जीवन रक्षक पथकांची उत्कृष्ट कामगिरी.

Fri Sep 16 , 2022
भुमिपुत्र संघटना व्दारे स्वयं सेवेतुन विर्सजन घाटाची स्वच्छता ढिवर समाज संघटना जीवन रक्षक पथकांची उत्कृष्ट कामगिरी.   कन्हान,ता.15 सप्टेंबर    शहरातील व ग्रामिण भागातील श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आल्याने मॉ काली माता मंदीर परीसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने भूमिपुत्र संघटना व्दारे स्वच्छता अभियान राबवुन परिसराची स्वच्छता करण्यात […]

You May Like

Archives

Categories

Meta