शिवनी जि. प. सर्कलमध्ये कोवीड चाचणी व जनजागृती , नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*शिवणी जि.प. सर्कलमध्ये कोव्हीड चाचणी व जनजागृती*
*नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद*

घाटंजी- तालुक्यातील शिवणी जिल्हा परिषद सर्कलमध्ये नागरिकांत जनजागृती करून कोव्हिड १९ ची चाचणी करून नागरिकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी प्रशासनाकडून कसोशीचे प्रयत्न सुरू आहे याच उपाययोजनेचा एक भाग म्हणून दिनांक २१ मे रोजी तहसीलदार पूजा माटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवणी जिल्हा परिषद सर्कल मधील आंबेझरी, सेवानगर, घाटुंबा येथे कोव्हीड १९ चाचणी चा कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्प च्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी कोव्हीड १९ ची चाचणी उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थित नागरिकांना कोव्हीड १९ या महामारीपासून मुक्त होण्यासाठी कोव्हीड चाचणी करणे गरजेचे आहे साधारण असलेले आजार नागरिकांनी अंगावर न काढता तपासणी करून उपचार केल्यास आपण व आपले कुटुंब सुरक्षित राहील याबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी यशवंत सिरभाते, ग्रामसचिव संदीप वाघ,तलाठी बाळकृष्ण येरमे, परिचारिका काजल वाघाडे, सहकर्मचारी एस डी हेमके,मोहम्मद जामिर शेक, आशा सेविका मनीषा उईके,बंजारा टायगर्स शहर अध्यक्ष संजय आडे,पोलीस पाटील राजेश चव्हाण, सरपंच निळू राठोड,सदस्य राजेश राठोड, आजाब आत्राम, ग्रा.प.कर्मचारी श्रीराम जाधव,कोतवाल भगवान जुमनाके,सुनील गेडाम सह आदींच्या उपस्थितीत हा कॅम्प पार पडला.


*या प्रसंगी बंजारा टायगर्स चे शहर अध्यक्ष संजय आडे व मंडळ अधिकारी सिरभाते साहेब यांच्या मार्फत गावकऱ्यांना कोरोना विषयी मार्गदर्शन करण्यात आले, लसीकरणा चे फायदे सांगण्यात आले व कोरोना RTPCR टेस्ट करण्याची आवश्यकता का आहे यावर प्रकाश टाकण्यात आला. लोकांचा प्रतिसाद पाहता जनजागृती केल्याने नक्कीच फरक पडतो या वेळी असे निर्दशनास आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पारशिवनी तालुक्यात वसूल प्रकल्प राबविला : जी.बी.वाघ

Tue May 25 , 2021
*पारशिवनी तालुक्याततिल् मौजा हुमरीकला व कान्हादेवी येथे कृषी मित्रांचे माध्यमातून अझोला प्रकल्प राबविला जाणार*. आहे ,कृपी मंडळ अधिकारी पाराशिवनी जि. बी. वाद्य *पाराशीवनी* (ता प्र):- पारशिवनी तालुक्यात तिल् मौजा हुमरीकला व कान्हादेवी येथे कृषी मित्रांचे माध्यमातून अझोला प्रकल्प राबविला जाणार आहे ,कृर्षी मंडळ अधिकारी जि बी वाद्य यांनी माहीती दिली […]

You May Like

Archives

Categories

Meta