रामटेक क्षेत्राची खोगीर भर्ती गेल्याने पुनश्च एक निष्ठ शिवसैनिकांची फौजच मा.उध्दव साहेबांच्या नेतुत्वात उभी करणार – प्रकाश भाऊ जाधवसुधिर सुर्यवंशी यांनी शिवसेना रामटेक विधान सभा संघटक पदी प्रेम रोडेकर यांची नियुक्ती. 

 

रामटेक क्षेत्राची खोगीर भर्ती गेल्याने पुनश्च एक निष्ठ शिवसैनिकांची फौजच मा.उध्दव साहेबांच्या नेतुत्वात उभी करणार – प्रकाश भाऊ जाधव

सुधिर सुर्यवंशी यांनी शिवसेना रामटेक विधान सभा संघटक पदी प्रेम रोडेकर यांची नियुक्ती.

कन्हान, ता.25 ऑगस्ट

    रामटेक विधानसभा, लोकसभेचे आमदार व खासदार बंडखोर एकनाथ शिंदे गटात गेल्याने रामटेक क्षेत्रातील जणु खोगीर भर्तीच कमी झाल्याने पुनश्च मा.बाळासाहेबाचे एकनिष्ठ शिवसैनिकांची मोठी फौजच मा.उध्दवजी ठाकरे साहेबांच्या नेतुत्वात रामटेक लोकसभा नव्हे तर संपुर्ण नागपुर जिल्हयात बळकट शिवसेना उभी करून आम्ही सर्व शिवसैनिक रामटेक च्या शिवसेना गडावर दुप्पटीने हिंदुत्वाचा भगवा फडकविणार. अशा ठाम विश्वासाने संकल्प शिवसेना माजी खासदार व नागपुर जिल्हा प्रमुख मा.प्रकाश भाऊ जाधव यांनी कन्हान येथील शिवसेना संपर्क अभियान कार्यक्रमात व्यक्त केला.

 

 शिवसेना कार्यालय तारसा रोड साई कॉम्पलेक्स कन्हान येथे आयोजित शिवसेना संपर्क अभियान कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा. सुधिर सुर्यवंशी संपर्क प्रमुख नागपुर जि.रामटेक लोकसभा क्षेत्र, मा. प्रकाश भाऊ जाधव शिवसेना माजी खासदार रामटेक लोकसभा, माजी जिल्हा प्रमुख नागपुर, उद्घाटक मा. राजु भाऊ हरणे जिल्हा प्रमुख नागपुर जिल्हा (ग्रा)आदीच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व हिंदु हुदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन करून ” जय भवानी जय शिवाजी च्या जय घोषाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी सह प्रमुख दिवाकर पाटणे, सुरेश साखरे, चंदु राऊत, युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम नवले, आयोजक प्रेम रोडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. रामटेकचे आमदार जैस्वाल व खासदार तुमाने यांनी सच्चे, एकनिष्ठ शिवसैनिकांना वाव न देता कोळसा, रेती चोरणा-या गुंड प्रवृत्तीच्या आणि इतर पक्षाच्या मंडळीला चालना दिल्याने शिवसेने पासुन एकनिष्ठ सच्चे शिवसैनिक व सुशिक्षित चांगला समाजाचा वर्ग दुरावला गेला होता. हे आजच्या परिस्थितीने स्पष्ट दर्शवित आहे. रामटेक विधानसभा, लोकसभेचे आमदार व खासदार बंडखोर एकनाथ शिंदे गटात गेल्याने रामटेक क्षेत्रातील जणु खोगीर भर्तीच कमी झाल्याने पुनश्च मा. बाळासाहेबाचे एकनिष्ठ शिवसैनिकांची मोठी फौजच मा.उध्दवजी ठाकरे साहेबांच्या नेतुत्वात रामटेक लोकसभा नव्हे तर संपुर्ण नागपुर जिल्हयात शिवसेना मजबुत करून आम्ही सर्व शिवसैनिक रामटेक च्या शिवसेना गडावर दुप्पटीने हिंदुत्वाचा भगवा फडकविणार. अशा ठाम विश्वासाने संकल्प शिवसेना माजी खासदार व नागपुर जिल्हा प्रमुख मा. प्रकाशभाऊ जाधव यांनी आपल्या शिव प्रबोधनात व्यक्त केला. जुने नविन शिवसैनिकांशी संपर्क करून नव्याने रामटेक विधानसभेत शिवसेना बांधणी करण्याकरिता शिवसेना संपर्क प्रमुख रामटेक लोकसभा क्षेत्र मा.सुधिर सुर्यवंशी यांनी रामटेक विधानसभा संघटक पद्दी मा. प्रेम रोडेकर यांची नियुक्तीची घोषणा केली. रामटेक विधानसभा संघटक म्हणुन प्रेम रोडेकर यांना शिवसेनेचा पदभार दिल्याने उपस्थित व क्षेत्रातील जुने, नविन शिवसैनिकांनी हर्ष करित  अभिनंदनाचा वर्षाव केला.

   रामटेक क्षेत्रातील आमदार, खासदार हेच बंडखोर एकनाथ शिंदे गटात गेले आहे, पदाधिकारी व शिवसैनिक मा. उध्दवजी ठाकरे च्या नेतुत्वात खंभीरपणे उभे असुन आता निवडणुका झाल्यातर रामटेक च्या खासदार व आमदारासह जिल्हयात दोन पेक्षा जास्त आमदार शिवसैनिक एकत्रित रात्रदिवस एक करून निवडुन आणतील असे स्पष्ट चित्र या शिवसेना संपर्क अभियानाच्या भरघोष प्रतिसादाने दिसत आहे. असे उद्घाटक मा.राजुभाऊ हरणे जिल्हा प्रमुख नागपुर जिल्हा (ग्रा) यांनी आपल्या शिव प्रबोधनातुन व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र चकोले यांनी तर आभार प्रभाकर बावणे यांनी केले. शिवसेना संपर्क अभियानाच्या यशस्वितेकरिता आयोजक – प्रेम रोडेकर, दिलीप राईकवार, रमेश तांदुळकर, कमलेश पांजरे, मोतीराम रहाटे, नरेन्द्र खडसे, कोठीराम चकोले, प्रविण गोडे, श्रीकृष्ण उके, लड्डु भाईजान, रंगलाल यादव, बबन नागमोते, अजय मडावी, नरेश दुधबावणे, भोला सोनेकर, देवा चतुर, एकनाथ खांदारे, नेवालाल पात्रे, धनराज तायवाडे, गोविंद जुनघरे, सचिन साळवी, विठ्ठल ठाकुर, जीवन ठवकर, बंटी हेटे, निशांत जाधव, कवडु भुते, पुरूषोत्तम येणेकर, महेंद्र भुरे, रूपेश सातपुते, गणेश मस्के, धर्मेन्द्र चहांदे, राजन मनगटे, कल्लुजी नाईक, मंगेश पाटील, अनिल लोंढे, हरिचंद्र मेश्राम,  ललन कुशवाह, दीपक रोडेकर, पुंडलिक नागपुरे, मंगेश खंगार, सत्यवान केणे, क्रिष्णा केझरकर, रामचंद्र मेश्राम, महेश चवरे, गणेश नागपुरे, गोविंदा कापसे, राहुल धोटे, अमन रहिले, मयुर नागपुर, सौ. पुष्पलता बावणे, सौ.भारती खडसे, सौ.सुशिलाताई फुलारे सह बहु संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

वर्गात गुरूजींचा फोटो लावण्यास शिक्षकांचा विरोध वादग्रस्त निर्णय मागे घेण्याची मागणी

Sat Aug 27 , 2022
  वर्गात गुरूजींचा फोटो लावण्यास शिक्षकांचा विरोध वादग्रस्त निर्णय मागे घेण्याची मागणी नागपूर,ता.27 ऑगस्ट          मा.सचिव शालेय शिक्षण विभाग व आयुक्त (शिक्षण) आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पूणे यांच्या दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी व्हिडीओ काँन्फरंस द्वारे दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांनी 25/08/2022 रोजी पत्र काढून […]

Archives

Categories

Meta