कन्हान शहर विकास मंच द्वारे स्वातंत्र्य दिनी महापुरुषांना अभिवादन

 

कन्हान शहर विकास मंच द्वारे स्वातंत्र्य दिनी महापुरुषांना अभिवादन

कन्हान,ता.15 ऑगस्ट

       कन्हान शहर विकास मंच द्वारे 75 व्या स्वातंत्र्य दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे व मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर यांच्या हस्ते  महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी मंच मार्गदर्शक भरत सावळे यांनी स्वातंत्र्य दिवस वर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत 75 वा स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा करण्यात आला .या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, सचिव सुरज वरखडे, सहसचिव प्रकाश कुर्वे, अनुराग महल्ले भरत सावळे , प्रभाकर रुंघे , आकाश पंडितकर , शाहरुख खान , कृणाल राजपुत , संजय तिवसकर सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहर व्यापारी संघटना व्दारे ध्वजारोहण 

Wed Aug 17 , 2022
  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहर व्यापारी संघटना व्दारे ध्वजारोहण  कन्हान, ता.15 ऑगस्ट      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शहर व्यापारी संघटना व्दारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे 75 व्या स्वातंत्र दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी लवजीं तिवारी यांचा हस्ते झेंडावंदन करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शामबाबु पिपलवा व प्रमुख […]

You May Like

Archives

Categories

Meta